मनपा आरोग्य विभागाकडे कोरोना रुग्णांची नोंद कशी होणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 21, 2022

मनपा आरोग्य विभागाकडे कोरोना रुग्णांची नोंद कशी होणार?

 ऑनलाईन होम टेस्टिंग किटचा होतोय वापर.

मनपा आरोग्य विभागाकडे कोरोना रुग्णांची नोंद कशी होणार?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची शंका आल्यावर शहरातील नागरिक ऑनलाईन होम टेस्टिंग किट मागून स्वतः तपासणी करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही डॉक्टर खोकला, सर्दी ची लक्षणे असणार्‍या रुग्णांना तात्पुरता उपचार करून कोरोना होम टेस्टिंग किटचा वापर करण्याचा सूचना देत असल्यामुळे या कोरोना रुग्णांची नोंद मनपा प्रशासनाकडे होत नसल्याचे दिसून येत आहे.
औषध विक्रेत्यांपेक्षा होम टेस्टिंग किटची मोठ्या प्रमाणात ऑनलाइन विक्री केली जात आहे आणि त्यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही. औषध विक्रेत्याने ग्राहकास आधार नंबर किंवा मोबाइल नंबर मागितल्यास ग्राहकाकडून त्यास विरोध केला जात आहे अथवा वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होत आहे.रुग्णाने सेल्फ टेस्टिंग किटचा वापर करून पॉझिटिव्ह आल्यानंतरही निगेटिव्ह असल्याचे सांगितल्यास त्यावर प्रशासनाचा कसा अंकुश राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये किटचा वापर रोखण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित  परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शासन अथवा प्रशासन जोपर्यंत ऑनलाइन विक्री थांबवणार नाही, तोपर्यंत हे कोरोना टेस्टिंग चे प्रकार थांबणार नसल्याचं दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment