इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगा, वाजवू देणार नाही ः शहर शिवसेनेचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 15, 2022

इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगा, वाजवू देणार नाही ः शहर शिवसेनेचा इशारा.

 इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगा, वाजवू देणार नाही ः शहर शिवसेनेचा इशारा.

भिंगार येथील घटनेद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हिंदूंच्या हनुमान चालीसेला वारंवार विरोध करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही समाज कंटक करीत आहेत. या प्रकारामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार आणि जाणून बुजून केला जात आहे. हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू दिला जाणार नाही असा इशारा नगर शहर शिवसेनेच्या वतीने पत्रक काढून देण्यात आला आहे. काल सायंकाळी भिंगार येथे मुंडे परिवाराच्या घरी हनुमान चालीसा पाठ सुरु होता. ही बाब न रुचल्याने आणि दोन समाजात जाणून बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही समाज कंटकांनी केलेला प्रकार खूप निंदनीय आहे. मुंडे परिवार करीत असलेली पूजा अर्चा त्यांच्या डोळ्यात खुपल्याने परिससरातील  सोहेल शेख आणि त्याचे तीन ते चार साथीदार मुंडे यांच्या घरात घुसले. त्यांनी मुंडे यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. आणि हनुमान चालीसा ज्या स्पीकरमधून ऐकू येत होती तो त्यांनी फोडून टाकला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे  महाराष्ट्र राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल भैय्या राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर , नगरसेवक सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. विचारपूस करून मुंडे परिवाराला व परिसरातील रहिवाशांना धीर दिला. शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोन्द्रे यांना सूचना करून या परिसराला संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.
यावेळी इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि भिंगारकर शिवसैनिकांची एकजूट पाहायला मिळाली.अशांतता पसरवून दहशत निर्माण करणार्‍याची गय केली जाणार नाही असे प्रकार पोलिसांनी न थांबविल्यास व संबंधितांवर त्वरित कारवाई न केल्यास कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यास त्यावेळी शिवसेना जबाबदार राहणार नाही असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकार्‍याची भेट घेतली व या घटनेशी संबंधितावर गुन्हे दाखल करून दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.
नगर आणि भिंगार मधील हिंदू समाज हा सहिष्णू आणि शांत वृत्तीचा आहे . पण तो कट्टर धर्माभिमानी देखील आहे.  आता प्रथेप्रमाणे नगर शहरात सर्व हिंदू सण उत्सवाचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शांततामय रीतीने पार पडतात. त्यात कोणाची अडथळा आणण्याची हिम्मत नाही. हनुमान चालीसा पठण , सामूहिक महाआरती असे कार्यक्रम घेताना जर कोणी समाज कंटकाने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर नगर शहर शिवसेना हे कदापिही खपवून घेणार नाही . जर असे प्रकार वारंवार घडले किंवा घडवून आणले तर हा निव्वळ खोडसाळ पणा आहे. दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. हे नगर जिल्हा प्रशासन व पोलिस यांनी समजून घ्यावे. इतर धर्मीय एरवी दिवसातून 5 -5 वेळा प्रार्थना करताना मोठ मोठ्या कर्णकर्कश्य आवाजात लाऊड स्पीकर लावतात. रात्री अपरात्री भल्या पहाटे हे भोंगे बांग देतात. त्यावेळी इतर समाज बांधव कोणतीच तक्रार करीत नाही हे सर्वानी समजून घ्यावे त्यामुळे जर अशा प्रकारची पुनरावृत्ती झाली तर नगर शहरातील एकाही इतर धर्मीय प्रार्थनास्थळातील भोंगा वाजू दिला जाणार नाही. अशा घटना घडवून शहरात दंगल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना हे कधीच खपवून घेणार नाही.  समाजात  दुहीची बीजे पेरण्याचा हा प्रकार आहे हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे असे शिवसेनेने पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment