तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेवून त्वरित उपाययोजना करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेवून त्वरित उपाययोजना करा.

 तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेवून त्वरित उपाययोजना करा.

उपमहापौर गणेश भोसले यांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असुन व ओमायक्रॉन या आजाराची तिव्रता लक्षात घेता अहमदनगर शहरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी लवकरात लवकर अहमदनगर महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरामध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होवून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येत होत्या तसेच शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जागा मिळणे अवघड झाले होते. अनेक रुग्णांना वेळेमध्ये औषधोपचार मिळू शकले नाही. या कोरोनाच्या लढ्यामध्ये अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याकरीता आर.टी.पी.सी.आर. व अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्यात यावी तसेच आशा लिंक वर्करमार्फत सर्व्हे करुन रुग्ण शोध मोहिम हाती घेण्यात यावी. शहरामध्ये ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढेल अशा भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी करण्यात यावी. महानगरपालिकेने कोविंड सेंटरची तयारी करुन त्या ठिकाणी आवश्यक असणारे डॉक्टर, नर्स, औषधे, ऑक्सिजन, जेवण व इतर आवश्यक त्या सुविधा पुरविणेबाबत कार्यवाही सुरु करावी. तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क करुन महानगरपालिकेस सहकार्य करणेबाबत पत्र देण्यात यावे. असे निवेदनात उपमहापौर यांनी म्हटले आहे.
संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका विचारात घेवुन महानगरपालिका हद्दीत कोरोना रोखण्यासाठी दक्षता पथकांमार्फत विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचे पालन होण्याकरीता बाजारपेठा, भाजीमंडई व गर्दीच्या ठिकाणी दक्षता पथकाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहनही उपमहापौर यांनी केले आहे. शहरामध्ये कोरोना व ओमायक्रॉनची संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेवून रुग्ण दगावु नये व त्यांना वेळेमध्ये उपचार मिळण्याकरीता तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीबाबत मला अवगत करावे,अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे उपमहापौर यांनी केली.

No comments:

Post a Comment