शिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

शिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला.

 शिर्डी विमानतळाने 10 लाख प्रवासी वाहतुकीचा टप्पा ओलांडला.


शिर्डी -
कोरोना काळातील पहिल्या व दुसर्‍या लाटेत मोठी निर्बंध असतानाही विमान सेवा देणार्‍या सर्व कंपन्यांच्या संपर्कात राहून नवीन प्रवासी सुविधा देत 10 लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळावरून 01 ऑक्टोबर 2017 रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने 3 जानेवारी 2022 रोजी 10 लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिर्डी या आंतरराष्ट्रीय विमानतळाने हे लक्ष्य संपादन करताना शिर्डी विमानतळावर जवळपास 13 हजार विमान उड्डाणांची नोंद केली. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावर स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली-हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरु करण्यात आली.

No comments:

Post a Comment