राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद.

 राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद.

परीक्षाही ऑनलाईन होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा.



मुंबई -
राज्यातील वाढत्या कोरोना आणि नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. असेही सामंत यांनी सांगितले.

शाळा पुन्हा बंद...

मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर पुणे आणि ठाणे आणि औरंगाबादेतील पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या काळात, ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment