डांबरीकरण, काँक्रिटीकरण, स्ट्रीट लाईट, बंद पाईप गटार योजना कामे मार्गी लावा; अन्यथा आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

डांबरीकरण, काँक्रिटीकरण, स्ट्रीट लाईट, बंद पाईप गटार योजना कामे मार्गी लावा; अन्यथा आंदोलन.

 डांबरीकरण, काँक्रिटीकरण, स्ट्रीट लाईट, बंद पाईप गटार योजना कामे मार्गी लावा; अन्यथा आंदोलन.

प्रभाग क्र, 5 व 6 मधील नागरिकांचा आयुक्तांना इशारा.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 5 व 6 मधील सुखकर्ता कॉलनी, रिद्धी सिद्धी कॉलनी, शिव कॉलनी, उज्वला कॉलनी, गणेश कॉलनी, शिवकृपा कॉलनी, विनायक कॉलनी, विवेकानंद कॉलनी परिसरात माजी नगरसेवक तयगा शिंदे यांनी केलेल्या विकास कामांना नंतर आत्तापर्यंत कोणीही या परिसरामध्ये विकास कामे केलेली नाही आतातरी महापालिकेला शुद्ध बुद्धी येऊन या परिसरामध्ये विकास कामे करून नागरिकांना मदत करावी. अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांचेकडे करत डांबरीकरण व काँक्रिटीकरण रस्त्यांची कामे, स्ट्रीट लाईट, बंद पाईप गटारी चे कामे मार्गी लावावी अन्यथा 30 जानेवारी रोजी वैदुवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रभाग 5 व 6 मधील नागरिकांनी दिला आहे.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी रस्त्याची कामे झालेली नसून आता हे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहे. या रस्त्यावरून चालणं सुद्धा कठीण झाले आहे. दररोज छोटे मोठे अपघात देखील होत आहे.या रोड वरून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन मणक्याचे त्रास देखील वाढले आहे. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 5 व 6 मधील नागरिक सुरेखा भिंगारदिवे,निर्मला अदवंत, माधुरी कुलकर्णी, मुग्धा कुलकर्णी, शारदा भंडारे, विमल जाधव, अर्चना कुंटे, जयंत कुलकर्णी, प्रज्ञा कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, उपेंद्र कुलकर्णी, मुरलीधर मुळे, ऋतुजा कुलकर्णी, मुरलीधर मुळे, मल्हार मुळे, बबन अदवंत, सोनाली जाधव, विनीत जाधव, ऋषिकेश चौधरी, देवेंद्र कुंटे, दर्शना कंटे, प्रीती घुमरे, सचिन घुमरे, रुजुला कुंटे, निलेश अदवंत, राजेश्वर कुंटे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment