शिवशक्ती सेना पक्षाची अहमदनगरमधून घोषणा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

शिवशक्ती सेना पक्षाची अहमदनगरमधून घोषणा!

 शिवशक्ती सेना पक्षाची अहमदनगरमधून घोषणा!

करुणा धनंजय मुंढेचं राज्याच्या राजकारणात पाऊल...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंढे यांच्या दुसर्‍या पत्नी यांनी आज शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा करत आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांच्या पत्नीने माझ्या पक्षात येण्यास सहमती दाखवली आहे, योग्य वेळी मी ते नाव जाहीर करेल असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
नव्या पक्षाची घोषणा करताना त्या म्हणाल्या की एक वर्षांपासून मी जीवन ज्योती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केलेले आहे. मात्र अनेक क्षेत्रात पाहतेय की अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार दिसून येतोय. या काळात अनेकांनी सांगितले की स्वतःचा राजकीय पक्ष काढा, अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापित करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचे नाव शिवशक्ती सेना असेल घोषणा त्यांनी अहमदनगर मध्ये एका पत्रकार परिषदेत केली.
मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे, या पक्षात समाजसेवा करणार्‍या कार्यकर्त्यांना स्थान असेल, गरज पडली तर मी स्वतः परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असें त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील जनतेला आवाहन आहे की, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान एकत्र या एक नवी पहल मी करत आहे. मी माझ्या पतीला सुद्धा माझ्या पार्टीत नाकारेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.सर्वराजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पत्नींना गप्प केले आहेत.आपण हिरे आहात एकत्र या, या माझ्या मोहिमेत एकत्र याअसे आवाहन त्यांनी केले.
आज समाजकारण करताना मला पॉवर मध्ये असणे गरजेचे वाटले त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा करत आहे समीर वानखेडे सारख्या अधिकार्‍यांना टार्गेट केले जात आंहे. दुसरी कडे अजित पवार, धनंजय मुंडे आदीं कडे 1500 करोड,900 करोड अशा मालमत्ता असल्याचे बोलले जातेय. मात्र यात केस दाखल होत नाही आणि अटकही होत नाही. त्यामुळे आता मी माझे जीवन जनसेवे साठी देत आहे. एसटी कर्मचारी दीड महिन्यापासून आंदोलन करतात पण सरकारला वेळ नाही. एक मंत्री गेला नाही, खोटे का व्हायना आश्वासन द्या, तसेही तुम्हीही निवडणूक काळात खोटे आश्वासने देतात ना असा आरोप त्यांनी राजकीय नेत्यांवर केला.घरात मी राजकारण पाहिले, पोलसंचा वापर कसा होतो मी पाहिले आहे. सध्य तीन पक्षांचे सरकार आहे, फक्त पोलिसांना बळी दिले जातेय. याची उदाहरणे परमाजीत सिंग, वानखेडे यांना भोगावे लागले असेही आरोप त्यांनी केले.

No comments:

Post a Comment