राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’

 राज्यस्तरीय बालएकांकिका महोत्सव ‘कांकरिया करंडक 2021’

25 डिसेंबर रोजी बालगोपालांसाठी धम्माल

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाटय क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे. त्याला एक गौरवशाली इतिहास आहे व अनेक राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या रंगभूमीने दिले आहे. त्याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट यांनी मागील 23 वर्षांपासून राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव (स्पर्धा) स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती ‘कांकरिया करंडक’ घेत असून बालरंगभूमीसाठी समर्पित ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा  असून आता हया स्पर्धेत भाग घेण्यासाठी महराष्ट्राबाहेरूनही संघ येत आहेत.
या वर्षी हे 24 वे वर्ष असून दि 25 डिसेंबर शनिवार नगर येथील माऊली संकुल येथे सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर या स्पर्धा होणार आहे. नाताळच्या सुट्टीत ही विशेष बालगोपाळांसाठी पर्वणी राहणार आहे. 25 डिसेंबर 2021 या दिवशी बालगोपाळांना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. या स्पर्धेद्वारे अनेकविध नेपथ्य, प्रकाश योजना, संहिता, संवाद फेक, अभिनय, रंग व वेषभूषा पाहिल्यामुळे या विषयीचा चांगला अभ्यास या निमित्ताने होणार आहे. मनोरंजना बरोबरच कलाकाराची जडणघडण येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त बालमंडळींनी याचा आस्वाद घ्यावा. सर्वासाठी प्रवेश मोफत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे आवाहन ‘कांकरिया करंडक’ च्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. कांकरिया करंडक 2021 चा परितोषिक वितरण 25 डिसेंबरला प्रमुख पाहुणे प्रसिध्द अभिनेते श्री रविंद्र नवले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदर प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री शिवाजी शिर्के, नाटय परिषद अहमदनगरचे अध्यक्ष श्री अमोल खोले, चित्रपट महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकिां नजान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री नवले यांनी मराठी चित्रपट आणि टि व्हि सिरीयल मध्ये काम केले आहे. त्यांचे बायको चुकली स्टँडवर, नवरा माझया मुठीत ग, नामदार मुख्यमंत्री, सत्ताधीश, पाठराखीन हे मराठी चित्रपट तर चार दिवस सासूचे, पाऊस येता येता, चुप बस लक्ष्या ह्या टि व्हि सिरीयल गाजल्या आहेत. अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. ‘कांकरिया करंडक’ ची संयोजन समिती खालीलप्रमाणे स्पर्धा प्रमुख डॉ. वर्धमान कांकरिया तसेच डॉ. मुकुंद देवळालीकर, श्री उमाकांत जांभळे, श्री दत्ता इंगळे, चि. स्मिरा कांकरिया, श्री सुभाष बागुल, मोईनुद्दिन इनामदार, श्री. सौदागर मोहिते, कु. प्रिया सोनटक्के, श्री मिलिंद भोगाडे, मार्गदर्शक श्री रमेशचंद्र छाजेड, श्री किरण कांकरिया, श्री रमेश बाफना, श्री शशिकांत नजान अशी माहिती सचिव सदाशिव मोहिते यांनी दिली.

No comments:

Post a Comment