अडीच वर्षात भाजपा-राष्ट्रवादी अभद्र युतीने नगर शहर भकास करून ठेवले. - किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 27, 2021

अडीच वर्षात भाजपा-राष्ट्रवादी अभद्र युतीने नगर शहर भकास करून ठेवले. - किरण काळे.

 अडीच वर्षात भाजपा-राष्ट्रवादी अभद्र युतीने नगर शहर भकास करून ठेवले. - किरण काळे.

काँग्रेसच्या मंथन बैठकीत स्वबळाचा नारा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
आपल्याला महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे. भाजपला सत्तेपासून रोखायच आहे. मागील अडीच वर्ष भाजपने शहरात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता उपभोगली. मात्र या अभद्र युतीने शहर भकास करून ठेवले. रस्त्यांची दुरावस्था आज आपण शहरात पाहत आहोत. कुणाला कुणा बरोबर जायचे ते जाऊ द्या. मात्र स्वबळावरती काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या मनपा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आयोजित शहर जिल्हा काँग्रेसची मंथन बैठक कालिका प्राईड येथील पक्ष कार्यालयात पार पडले. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्या बद्दल यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना शहर जिल्हाध्यक्षांसमोर व्यक्त केल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील स्थानिक राष्ट्रवादीचे नेतृत्व हे सातत्याने शहरातील भाजपशी सलगी करत भाजपा वाढविण्यासाठीच काम करते आहे की काय असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मंथन बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर तोफ डागली. यावेळी कार्यकर्त्यांनी 2023 च्या आगामी मनपा सार्वत्रिक निवडणूकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्वबळावर लढण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे केली.
यावेळी मंथन बैठकीला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या भावनांची आपण दखल घेतली आहे. शहरातील काही नेतेमंडळी एका पक्षात राहून शहरातील सर्वच पक्ष आम्ही चालवतो अशा आविर्भावात आहेत. पोटनिवडणुकीत महाआघाडीचा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला याची खंत काँग्रेस पक्षाला आहे. शिवसेनेच्या नेत्यांची या संदर्भामध्ये आपण निवडणुकीनंतर संवाद साधला आहे. सेना, काँग्रेसचे संबंध उत्तम आहेत. काँग्रेस ही कुणाच्या दावणीला नाही. शहर काँग्रेसमध्ये फक्त राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचाच आदेश चालतो. कार्यकर्त्यांच्या भावना काँग्रेस ना. थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना निश्चितपणे कळविल्या जातील.
यावेळी बोलताना ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे म्हणाले की, भाजपाच्या केंद्र सरकारने एम्पिरिकल डाटा सादर न केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. त्यामुळे आज ओबीसींचे राजकीय नेतृत्व संपवण्याचा डाव भाजपचा यशस्वी होताना दिसत आहे. शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद म्हणाले की, सीएए, एनआरसीचा मुद्दा पुढे करत या देशांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या भावना भाजपने दुखावल्या. नगर शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाने हजारोच्या संख्येने मोर्चा काढत त्याचा निषेध केला. त्याच जातीवादी भाजपच्या निवडून आलेल्या उमेदवाराचा सत्कार राष्ट्रवादीने केला. यामुळे धर्मनिरपेक्ष असणार्‍या अल्पसंख्यांक मतदारांचा विश्वासघात राष्ट्रवादीने केला असल्याचा आरोप सय्यद यांनी बैठकीत केला. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, काही लोक वरतून निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष मतांसाठी भाजप विरोधी भूमिका असल्याचे नाटक करतात. मात्र अंधारात आपल्या सोयार्‍यांच्या माध्यमातून भाजपचे काम करतात. ही दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीचे शहरात नुकसान करणारी आहे. ही मंडळी ना महाविकास आघाडीची आहेत ना भाजपचे आहेत. शहरातील मतदारांनी याचा विचार करण्याचे आवाहन यावेळी गुंदेचा यांनी केले. पोट निवडणुकीचा वस्तूनिष्ठ अहवाल राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाठवायची मागणी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी यावेळी केली. तसा अहवाल पाठवण्याचा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.  
उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ.हनिफ शेख, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, उपाध्यक्ष अरुण धामणे यांच्यासह पक्षाच्या महिला, युवक, कामगार, विद्यार्थी, वकील, शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment