हिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, December 27, 2021

हिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध.

 हिवरेबाजार सहकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थापनेपासूनच बिनविरोध निवडणुकीचा इतिहास असणार्‍या आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक यावर्षीही पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.
संचालक मंडळात खुल्या प्रवर्गातून रामभाऊ चत्तर, छबू ठाणगे, मारुती ठाणगे, अशोक गोहड, बबन पवार, संजय ठाणगे, धर्मराज ठाणगे, गोपीनाथ ठाणगे, महिला प्रवर्गातून संजना पादीर, चंद्रकला ठाणगे, अनुसूचित जाती प्रवर्गातून साहेबराव कदम इतर मागास प्रवर्गातून दत्तात्रेय भालेकर, विशेष मागास प्रवर्गातून विठ्ठल चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
संस्थेवर 13 संचालक मंडळ असून फक्त 13 फॅार्म प्राप्त झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. आदर्श गाव हिवरे बाजाराची विविध कार्यकारी सेवा सोसायटी सभासद व बँक पातळीवर दरवर्षी 31 मार्चपूर्वी 100 टक्के वसुली होते. सभासदांना 10 टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सेवा सोसायटीचे सचिव अल्ताफ शेख व कुशाभाऊ ठाणगे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here