कर्जत नगर पंचायतीच्या प्रभाग 13 च्या उमेदवार सौ शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 19, 2021

कर्जत नगर पंचायतीच्या प्रभाग 13 च्या उमेदवार सौ शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ

 कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 13 च्या उमेदवार सौ शिंदे यांच्या प्रचाराचा  शुभारंभ.नगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 13 च्या भाजपाच्या उमेदवार सौ वनिता परशुराम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या हाताने फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

             कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सध्या भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी जोरदार लढत पाहावयास मिळत असून शहराचा मुख्य भाग असलेल्या व संत श्री गोदड महाराजांचे मंदिर असलेल्या प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार भाजपाचे उमेदवार सौ वनिता परशुराम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ संत श्री गोदड महाराजांच्या मंदिरात माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आला, यावेळी सचिन पोटरे, उमेश जेवरे, ज्ञानदेव लष्कर, अनिल थोरात, उमेश चावरे, आदींसह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

           सौ. वनिता शिंदे यांचे सासरे जगन्नाथ शिंदे हे जुने संघाचे कार्यकर्ते होते त्याच्या बरोबर त्याचा मुलगा परशुराम यानेही संघाच्या शाखेत जाऊन समाजाच्या कामात मदत योगदान दिलेले आहे, गेली अनेक निवडणुकीत त्यांनी भाजपाचे एकनिष्ठ पणे काम केलेले असून पडत्या काळात ते  पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत भाजपाचे खा. सुजय विखे, प्रा राम शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादा सोनमाळी यांच्या मार्गदर्शना खाली शिंदेची वाटचाल सुरू असून प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी, प्रा राम शिंदे यांनी मंजूर केलेला विकास आराखडयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी सर्वानी प्रचाराला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here