सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 31, 2021

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व.

 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला दे धक्का दिला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने वर्चस्व मिळविल्यानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधी शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटला होता. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर राजकीय राडा पाहायला मिळाला. हे प्रकरण पोलिसांत गेले.भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही हल्ल्याचा कटाचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, राणे गटाने आपले वर्चस्व मिळवले आहे.

No comments:

Post a Comment