मी मंत्री झाल्यापासूनच माझ्यावर कोट्यावधींचे आरोप- प्राजक्त तनपुरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

मी मंत्री झाल्यापासूनच माझ्यावर कोट्यावधींचे आरोप- प्राजक्त तनपुरे.

 मी मंत्री झाल्यापासूनच माझ्यावर कोट्यावधींचे आरोप- प्राजक्त तनपुरे.


राहुरी -
माझं नाव घेऊन टीका केली. टिव्हीवरही प्रतिक्रिया दिली. मंत्री प्राजक्त तनपुरे प्रसाद शुगरच्या संचालक मंडळात आहेत, असे सांगितले. पण मला एक आश्चर्य वाटलं. त्यांना माझं नाव कसं घेता आलं. माझं नाव उच्चारायला अवघड आहे. त्यांनी प्राजक्त हे पूर्ण नाव उच्चारलं कसं. मला त्यांच्या व्यंगावर टीका करायची नाही पण वास्तविक पाहता 13 कोटी कुठे आणि 100 कोटी कुठे. 13 कोटीचा संदर्भ त्यांनी 100 कोटीशी लावला. मलाही आठवत नाही त्यावेळी कारखाना खरेदी केला आहे. त्यावेळी एवढे बाजारभाव नव्हते. हे कोट्यावधीचे आरोप मी मंत्री झाल्यापासून सुरू झाले आहेत. असा आरोप नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला आहे.

काल राहुरी येथे राष्ट्रवादी परिसंवाद कार्यकर्ता शिबिरात मंत्री तनपुरे बोलत होते. तनपुरे पुढे म्हणाले की, मला ईडी कार्यालयाने बोलावल्यावर मी एकटाच साध्या कपड्यांत गाडीत बसून गेलो होतो. चौकशी नंतर थोड्यावेळाने परत आलो, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. टेन्शन घेण्याचे कारण नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय याचा अभिमान आहे. राहुरी तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व जागांवर दैदिप्यमान विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन ही प्राजक्त तनपुरे यांनी केले.

मंत्री तनपुरे यांनी सांगितले की, तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट, राहुरी पालिकेत तीन प्रभाग वाढणार आहेत. त्यांची रचना कुणालाही माहिती नाही. त्यामुळे, इच्छुकांनी दमाने घ्यावे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. उमेदवार ठरल्यावर एकदिलाने काम करावे. राहुरीतील जॉगिंग ट्रॅकसाठी आणखी दोन कोटी रुपये व शहरातील चौक, बगीचे सुशोभीकरणासाठी 50 लाख असा अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. राहुरीच्या बसस्थानकासाठी अर्थसंकल्पात 17 कोटींची तरतूद केली होती. परंतु, एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधी वळविल्याने काम प्रलंबित आहे. त्यावर लवकरच तोडगा काढू. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा वाद लवकरच मिटणार आहे. येत्या काळात रुग्णालय इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल. राहुरी शहरातील भुयारी गटार योजनेचे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागेल. असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माहिती, तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव, धीरज पानसंबळ, धनराज गाडे, सभापती बेबी सोडनर, विठ्ठल मोकाटे, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, विजय कातोरे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment