जिल्हा कारागृहात बोर्ड ऑफ व्हिजिटर्सची बैठक संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

जिल्हा कारागृहात बोर्ड ऑफ व्हिजिटर्सची बैठक संपन्न.

 जिल्हा कारागृहात बोर्ड ऑफ व्हिजिटर्सची बैठक संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 30 नोव्हेंबर 2021 रोजी अहमदनगर जिल्हा कारागृहात बोर्ड ऑफ व्हिजिटर्सची बैठक पार पडली. बैठकीत अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी कारागृहास भेट देवून कैद्यांचे जेवण, सोयी सुविधा, बराक, कोठडी, कारागृह इमारत यांचे निरीक्षण केले.कैद्यांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा रजिस्टर दैनंदिनी इत्यादी सर्व बाबींची पाहणी केली. तसेच कारागृहाच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी कारागृहातील विविध उपक्रमांची माहिती कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी बैठकीचे अध्यक्ष व इतर सदस्यांना दिली. कारागृहातील सुधारणात्मक उपक्रमांमध्ये कैद्याच्या आहारामध्ये बदल करून दर रविवारी डाळ खिचाडी तर दर गुरूवारी जिरा राईस देण्यात येतो, कैद्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध आजारांवरील आरोग्य शिबीर घेण्यात येते, कैद्यांना गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी विविध बैठे खेळ उदाहरणार्थ कॅरम, लुडो, सापशिडी व मनोरंजनसाठी टीव्ही इत्यादी बाबी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून कैद्यांना कायदेविषयक सहाय्य व मार्गर्शनदेखील देण्यात येते. अश्या अनेक बाबीची माहिती देण्यात आली.
कारागृहातील कैद्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी विभागीय कारागृह उपमहनिरीक्षक श्री योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी विशेष प्रयत्न करून सीजी पॉवर अँड इंडस्ट्रिअल सोल्युशन लि. कंपनी, एमआयडीसी, अहमदनगर यांच्या सीएसआर फंडमधून 150 लीटर प्रती तास पाणी शुध्दीकरण करणारे वॉटर प्लांट बसविण्यात आला. सदर वॉटर प्लांटचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वॉटर प्लांटसाठी सदर कंपनीचे श्री गौतम सुवर्णपाठकी, युनिट हेड, दीपक नेमाडे, प्रदीप साळवे, श्री ज्ञानेश्वर डमाले यांनी मोलाचे सहकार्य केले.
या बैठकीस मा जिल्हादंडधिकारी डॉ श्री राजेंद्र भोसले, अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्री रामटेके, कार्यकारी अभियंता श्री पवार, पोलीस उपअधिक्षक श्री डांगे, उपविभागीय दडाधिकारी श्री श्रीनिवास अर्जुन, परिविक्षा अधिकारी श्री सांगळे व इतर विभागाचे प्रतिनिधी हजर होते. तसेच कारागृहाचे अधीक्षक श्री शामकांत शेडगे, कारागृहाचे डॉक्टर श्री जाधव, जेलर श्रीमती शिंदे, जेलर श्रीमती बेडवाल, फार्मसिस्ट श्रीमती सोनमाळी व इतर कर्मचारी हजर होते.
या बैठकीचे अध्यक्ष मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे असतात. तसेच या बैठकीचे इतर एकूण 25 सदस्य असतात. सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा शासकिय अभियोक्ता, पोलीस उपअधीक्षक, महापौर, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिविक्षा अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी इत्यादी सर्व या बैठकीचे सदस्य असून कारागृहाचे अधीक्षक हे सदस्य सचिव असतात.
अहमदनगर जिल्हा कारागृहाची इमारत साधारण इ.स.1570 ची आहे. या इमारतीला चांद बिबीचा मंगनी महाल असे म्हणत. सन 1940 साली त्याचे कारागृहात रूपांतर झाले, तर सन 1945 मध्ये या इमारतीचे जिल्हा कारागृह, वर्ग 2 असे नामकरण करण्यात आले होते. तेव्हापासून हे कारागृह जिल्ह्याचे वर्ग 2 चे कारागृह आहे. या कारागृहाची अधिकृत बंदी संख्या 69 असून या कारागृहात सरासरी 200 ते 250 बंदी म्हणजेच 3 पटीहून अधिक बंदी ठेवण्यात येतात.

No comments:

Post a Comment