विद्युत विभागाने चांगली सेवा द्यावी अन्यथा राजीनामा देऊन घरी बसा : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

विद्युत विभागाने चांगली सेवा द्यावी अन्यथा राजीनामा देऊन घरी बसा : आ. जगताप

 विद्युत विभागाने चांगली सेवा द्यावी अन्यथा राजीनामा देऊन घरी बसा : आ. जगताप

ग्राहकांच्या निराकरण करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करा.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  नगर शहरातील चएउइ च्या ग्राहकांना चांगली सुविधा द्यावी अन्यथा राजीनामे देऊन घरी बसा. बीएसएनएल  विभागाप्रमाणे चएउइ विभागाची गत होऊ न देण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचार्‍यांवर आहे. यासाठी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तातडीने सोडवा. ग्राहकांना वीज बिल हे जास्त दराने आकारण्यात येत आहे. ज्याच्या घरी टीव्ही, फ्रिज नाही त्यांना दहा ते बारा हजार रुपयेचे विज बिल जाते. या चएउइच्या गलथान कारभार  ग्राहक वैतागले आहेत. भविष्यकाळात ग्राहक रस्त्यावर उतरून चएउइ विरुद्ध आंदोलन व मोर्चे मोठ्या  काढण्याची वेळ येईल. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करावी व आलेल्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे. चएउइ च्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन आपले काम चांगल्या पद्धतीने करावे अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या.
आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील नागरिकांच्या चएउइ च्या  तक्रारींची निराकरण करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उबेद शेख, राष्ट्रवादी अर्बल सेलचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद शिंदे, जिल्हाध्यक्ष युवक शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित खोसे, नगरसेवक विनित पाऊलबुधे, संजय चोपडा, सुनील त्रिंबके, संजय सपकाळ, संतोष ढाकणे, पै ओंकार घोलप, सुरेश बनसोडे, साधना बोरुडे, अंजली आव्हाड, संजय जिंजे, चएउइ अधिकारी एस.जी.ठाकूर, बी.एस.भराडे, श्री लहामगे, व अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उबेद शेख म्हणाले की नागरिकांच्या विद्युत विभागाच्या विरोधात विविध तक्रारी आहेत. त्याचे निराकरण विद्युत विभागाकडून होत नाही. चएउइची  चूक असताना नागरिकांनी जास्त दराने बिल भरावे लागते. विद्युत बिलाचा मोठा घोळ सुरू आहे. नागरिकांना फसवण्याचे काम चएउइ करत आहे. ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन विज कट करण्याचे धमकी देत आहे. दर महिन्याला वीज बील न देता अचानक पणे एकदम वाढीव बिले दिली जातात. व जुलमी पद्धतीने चुकीच्या बिलाची वसूल केली जाते. मीटर बाबत तक्रार केली असता परस्पर दुरुस्तीच्या कारणाने मीटर काढून घेऊन जातात. मीटर न तपासता सांगितले जाते की तुमचा मीटर चांगला आहे तुम्हाला विज बिल भरावेच लागेल. ग्राहक आर्थिक परिस्थिती नसतानाही इकडून तिकडून पैसे गोळा करून विज बिल बारतात यापुढील काळात नागरीकांची तक्रारचे निराकरण होणे गरजेचे आहे. वाढीव वीज बील न देता रीतसर युनिट प्रमाणे बिल द्यावे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment