सेवाप्रीतच्या वतीने बुधवारी उमंग 2021 फेस्टचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 17, 2021

सेवाप्रीतच्या वतीने बुधवारी उमंग 2021 फेस्टचे आयोजन

 सेवाप्रीतच्या वतीने बुधवारी उमंग 2021 फेस्टचे आयोजन

महिलांना सहभागी होण्याचे आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महिलांच्या सक्षमीकरणासाठी व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बुधवार दि.22 डिसेंबर रोजी बुरुडगाव रोड येथील अंकुर लॉनमध्ये उमंग 2021 फेस्टचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय यांनी दिली.  महिलांच्या सक्षमीकरणासाठी व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी महिला एकत्र येऊन सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून योगदान देत आहे. कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेला, नोकर्या गेल्या तसेच विविध व्यवसाय करणार्या महिलांवर देखील आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत महिलांना एक व्यासपिठ निर्माण करुन त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सेवाप्रीतने उमंग 2021 फेस्टचे आयोजन केले आहे. उमंग या मेळाव्यात महिलांचे खाद्य पदार्थ, हस्तकला, विविध साहित्य, वस्त्रांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्या महिलांसाठी विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच महिलांची मोफत आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे. बुधवारी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. उमंग फेस्टमध्ये महिलांना आपल्या व्यवसायाशी निगडीत स्टॉल लावण्याचे तर इतर महिलांना या फेस्टमध्ये सहभागी होऊन महिलांना प्रोत्साहन देऊन अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सेवाप्रीतच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment