परीक्षा देण्याची संधी हुकली, तर जबाबदार कोण? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

परीक्षा देण्याची संधी हुकली, तर जबाबदार कोण?

परीक्षा देण्याची संधी हुकली, तर जबाबदार कोण?

हॉल तिकीट वर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा.
पोलीस भरती परीक्षार्थींचे हाल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज महाराष्ट्र राज्य पोलिस रिक्रूमेंट मार्फत जेल पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी राज्यात विविध ठिकाणी सेंटर दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सुपे येथील एमईटी इंग्लिश मीडियम स्कूल हे या परीक्षेसाठी केंद्र नियुक्त केले आहे. मात्र परीक्षार्थी मुलांच्या हॉल टिकीटावर पारनेर माऊली इंग्लिश मीडियम स्कूल, असा पत्ता लिहिला आहे. त्यामुळे परीक्षार्थी थेट पारनेर येथे पोहचत आहेत. तेथे ही शाळाच नसल्याने त्यांचा मोठा संभ्रम झाला आहे. शिवाय या नावाची शाळा तालुक्यातच नाही, असाही संभ्रम काहींचा झाला आहे. त्यातच राज्यभरातून आलेल्या मुलांना हा परीसर नवीन आहे. सध्या एसटी बसचा संप असल्याने आता परीक्षार्थींना पारनेर येथून सुपे येथे जाताना हाल सोसावे लागले आहेत.
महाराष्ट्र राज्य पोलिस रिक्रूमेंट मार्फत आज पोलिस भरती परीक्षा राज्यभर घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर जात आहेत. पारनेर तालुक्यात परीक्षेच्या हॉल टिकीटवर केंद्राचा पत्ता चुकीचा झाल्याने अनेक परीक्षार्थींची ससे होलपट होत आहे. त्यातच एसटी बसही बंद असल्याने अनेकांचे मोठे हाल झाले आहेत. तसेच अनेकांची परीक्षा देण्याच संधीही हुकणार आहे यास जबाबदार कोण असा, सवाल परीक्षार्थी विचारू लागले आहेत. ही परीक्षा देण्याची पुन्हा संधी या तरूणांना मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एमईटी इंग्लिश मीडियम स्कूलने परीक्षा केंद्रासाठी फक्त आठ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत. प्रत्येक खोलीत 24 परीक्षार्थी या प्रमाणे 192 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था आहे व तेवढ्याच मुलांचे सेंटर द्यावे अशी मागणी केली होती. मात्र परीक्षा घेणार्‍या आयोजकांनी त्यांना थेट 20 खोल्यांची सोय करण्यास सांगितली आहे. त्यामुळे स्कूल प्रशासनाला थेट मैदानावर खुर्ची व टेबल टाकून काही मुलांची परीक्षेसाठी सोय करावी लागली आहे. 480 परीक्षार्थींची परीक्षा विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. सौजन्य म्हणून आम्ही पारनेर येथे चुकीने गेलेल्या परीक्षार्थींना सुपे येथे येण्यासाठी सोय केली आहे. आम्ही आमच्या शाळेच्या पाच बस पारनेर येथे पाठविल्या आहेत. तेथून परीक्षार्थींना मोफत आणण्याची सोय केली आहे. तसेच पारनेर बसस्थानकावर तसा फलकही लावला असल्याचे अध्यक्ष एमईटी इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे. चे अध्यक्ष अनिकेत पठारे यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment