नियोजनबद्ध कामे करुन प्रलंबित प्रश्न सोडविणार - महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 11, 2021

नियोजनबद्ध कामे करुन प्रलंबित प्रश्न सोडविणार - महापौर रोहिणी शेंडगे

 नियोजनबद्ध कामे करुन प्रलंबित प्रश्न सोडविणार - महापौर रोहिणी शेंडगे

प्रभाग क्र. 8 मधील बागडेमळा येथील ड्रेनेज लाईन व अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील प्रत्येक भागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईनचे कामे करुन विकास करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वाढत्या वसाहती आणि लोकसंख्येचा विचार करुन प्रत्येक भागात ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करुन त्यानंतर रस्त्याची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता खोदून, खराब होणार नाही, अशा पद्धतीने नियोजनबद्ध कामे सुरु आहेत. आता मी या भागातील लोकप्रतिनिधी व महापौर असल्याने प्रभागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त  निधी उपलब्ध करुन देऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येतील. नागरिकांनीही आपल्या भागातील विविध प्रश्नांसाठी पाठपुरवा करुन विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वांच्या समन्वयातून आपल्या भागाचा विकास होईल, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
प्रभाग क्र. 8 मधील बागडेमळा येथील वसंत विहार अपार्टमेंट परिसरातील ड्रेनेज लाईन व अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महिला बाल कल्याणच्या सभापती पुष्पा बोरुडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, श्रीगोपाल जाखोटिया, सतीश नराल, चिकू अडसूळ, योगेश सिकची, योगेश सोहनी, सुनिल शेंडगे, साधना बेद्रे, सचिन गिते, संगीता सिकची, सौ.राऊत, सौ.बांडे, वामन, सावज, गुगे, लोंढे, गणेश पिस्का आदि उपस्थित होते.
याप्रसंगी पुष्पा बोरुडे म्हणाल्या, गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील आवश्यक प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आपण कायम पाठपुरवठा केला आहे. यामुळे अनेक भागातील प्रश्न मार्गी लागत आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागातील कामे होत आहे. आता महापौर आपल्याच प्रभागातील असल्याने प्रलंबित प्रश्नही मार्गी लागतील. त्याचबरोबर आपण महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवू, असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, अनिल बोरुडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गिते यांनी केले तर आभार योगेश सिकची यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment