कर्जतचा झाला बिहार! निवडणूक प्रक्रियेत गोंधळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

कर्जतचा झाला बिहार! निवडणूक प्रक्रियेत गोंधळ

 कर्जतचा झाला बिहार! निवडणूक प्रक्रियेत गोंधळ

प्रा राम शिंदे यांचे ग्रामदैवतासमोर ठिय्या देत मौन आंदोलन

कर्जत येथे ग्राम दैवत संत श्री गोदड महाराज मंदिरा समोर माजीमंत्री प्रा राम शिंदे यांचे आंदोलन सुरू असतानाच आज दुपारी 12-45 च्या दरम्यान आ. रोहित पवार ही आपल्या कार्यकर्त्यासाठी श्री गोदड महाराजांच्या मंदिरात दर्शनास आले, यावेळी दोन गट सामोरासमोर आल्याने वातावरण तंग झाले होते, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता, यावेळी दोन्ही गटाने अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कर्जत बिहार होण्याच्या मार्गावर दहशत, दादागिरी, दडपशाही करून अमिष दाखवून आ रोहित पवार हे लोकशाहीची हत्या करत असून त्यास प्रशासकीय अधिकारी ही सामील आहेत त्यामुळे आमच्या निवडणूक प्रक्रिया राबविणार्‍या प्रशासनावर विश्वास राहिलेला नसून याची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाच्या मंदिरासमोर मौन व ठिय्या आंदोलन केले.
कर्जत नगर पंचायतीच्या निमित्ताने कर्जतचा बिहार होत आहे, येथील निवडणूक घेणारे प्रशासन आ रोहित पवार यांना पूर्णत: सामील झाले असून हे नोकरदार आहेत की पवारांचे कार्यकर्ते आहेत असा घणाघात भाजपाच्या पदाधिकार्‍यानी यावेळी केला.
आज दुपारी 2 वा भाजपाने काळ्या फिती लावून कर्जत शहरातून मुकमोर्चा काढला व श्री अक्काबाई मंदिरा जवळ या मोर्चाची सांगता झाली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.यावेळी सुनील कर्जतकर, जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, राजेंद्र म्हस्के, सुनील यादव, शांतीलाल कोपनर, आदी सह अनेक जण उपस्थित होते,
यावेळी कर्जत ही क्रांतीची नगरी आहे, आपण लोकशाही च्या गप्पा मारता मग होऊ द्या ना निवडणूक जर आपण विकास केला असेल तर जनतेच्या तराजूतुन येऊ द्या अशी टीका केली, आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली, ज्याच्या विरुद्ध आपण बोलणार होतात त्यांना बरोबर घेऊन आपन आमच्याशी लढणार का? दांडके घेऊन मत मागता येत नसतात, आपल्याला गुजगोष्टी सांगणार्‍याच्या पद्धतीने आपण निवडणूक लढवाल तर आम्ही निवडणूक बाजूला ठेवू व जशास तसे उत्तर देऊ अशी जोरदार भाषणे झाली.कर्जत नगरपंचायत निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अभूतपूर्व गोंधळ झाला, यावेळी भाजपाच्या काही प्रमुख उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, दुपारी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जोगेश्वरवाडी येथील उमेदवार माजी नगरसेविका नीता कचरे व भाजपाच्याच दुसर्‍या उमेदवार प्रियांका कचरे यांना आणून अर्ज माघारी घेण्यासाठी थेट अधिकार्‍यांपुढे उभे केले असता यास भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, उमेदवारांवर दडपण आणणे योग्य नाही दहशतीचे राजकारण चालणार नाही असे म्हणत अधिकार्‍यांना धारेवर धरले, यावेळी कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी ही झाली, यावेळी अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय घेत भाजपचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते याठिकाणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे हे ही आले व त्यांनी ही अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले यावेळी सर्वांसमक्ष मागे उभ्या असलेल्या दोन भाजपा उमेदवारांना आपल्याला उमेदवारी माघारी घ्यायची आहे का असे विचारले असता नीता कचरे यांनी रडवेल्या चेहर्‍याने होकार देत माघारीच्या अर्जावर सही केली. यानंतर प्रा राम शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यासह तेथून बाहेर पडत थेट कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरा समोर जाऊन महाराजाच्या दरबारात न्याय मागण्याचा मार्ग अवलंबला व मंदिरासमोर मौन धरून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादासाहेब सोनमाळी यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या.
आ. पवारांचे कार्यकर्ते उमेदवारांवर दादागिरी करत त्यांना धमकावत असून यापद्धतीने लोकशाही मध्ये निवडणुका होऊ शकत नाहीत, असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी  किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, पप्पूशेठ धोदाड, काकासाहेब धांडे, बापूसाहेब शेळके, ज्ञानदेव लष्कर, अश्विनी गायकवाड, संजय भैलूमे, आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment