बाळासाहेब थोरात.. शहिद एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला मदत द्या - गुणरत्ने सदावर्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 14, 2021

बाळासाहेब थोरात.. शहिद एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला मदत द्या - गुणरत्ने सदावर्ते

 बाळासाहेब थोरात.. शहिद एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला मदत द्या - गुणरत्ने सदावर्ते


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रसिद्ध वकील, आंबेडकरवादी म्हणून प्रसिद्ध असलेले गुणरत्ने सदावर्ते हे राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या बाजूने आंदोलनात उतरलेले असून त्यांनी आज तारकपूर एसटी आगारात येत येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना सदावर्ते यांनी नांदेड मध्ये एक कर्मचार्‍याच्या आत्महत्येवर तेथील काँग्रेसचे  नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित कर्मचार्‍याच्या कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीत घेऊ आणि आर्थिक मदत करू असे शासनाच्या वतीने जाहीर केले, मात्र अहमदनगर जिल्ह्यात दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केलेल्या असताना जिल्ह्यातील काँग्रेस चे मंत्री बाळासाहेब थोरात अजून अशा कोणत्याही मदतीबाबत बोलत नाही. तुम्ही जिल्ह्याचे पालक आहांत, मंत्री पदाची शपथ घेताना तुम्ही जनतेसाठी वचनबद्ध आहात.. मग आज यावर मंत्री थोरात बोलत नसल्याबद्दल सदावर्ते यांनी टीका केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here