हिवताप कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

हिवताप कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन.

 सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी.

हिवताप कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संचलनाचे विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचारी या संवर्गाची जुने अस्तित्वात असलेले सेवा प्रेवश नियम शासनाने लागु केल्याने संवर्गातील पदोन्नत्ती पात्र कर्मचार्यांची पदोन्नत्तीची प्रक्रिया व नवीन भारती प्रक्रिया रखडलेली आहे. नगर नवीन सेवा प्रवेश नियम सेवेतील जुन्या कर्मचार्यांना हिताचे नसल्याने या नियमांमध्ये सुधारणा व्हावी. यासाठी राज्यातील हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेच्यावतीने आजपासून ‘लेखणीबंद’ आंदोलन सुरु केले आहे.
पदोन्नत्ती साखळी पदांमध्ये शैक्षणिक पात्रतेत वाढ केली असल्याने व जुन्या नियमाप्रमाणे सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांकडे ही शैक्षणिक पात्रता नसल्याने हे नवीन नियम जुन्या कर्मचार्यांच्या हिताचे नसल्याने यात सुधारणा व्हावी. यासाठी दि.26/10/21 व 30/11/21 रोजी राज्यातील कर्मचार्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन व आक्रोश आंदोलन केले होते. तथापी शासनाने ही गांभीर्याने घेतली नसल्याने आज पासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सदरच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात यावी, या एकमेव न्याय व हक्काच्या मागणीसाठी प्रशासन दोन महिन्याांपासून राज्यातील हिवताप कर्मचार्यांची बोळवण करीत आहे, त्यामुळे हे लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. तरीही शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे आणखी तीव्र लढा सुरु ठेवून मागण्या मान्य होऊपर्यंत लढा दिला जाईल असेही म्हटले आहे.
या आंदोलनात अध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, आदि पदाधिकार्यांसह सतीश जाधव, संतोष सुरवसे, कैलास ढगे, जनक बागल, अरुण लांडे, विनायक वाडेकर, गोविंद भावत, प्रसाद टकले, गोकुळ नारळे, संजय साठे, अनिल मुळे, दत्तात्रय पुंड, नितीन नेवासकर, वैभव चेन्नुर, नरेंद्र पवार, लक्ष्मण ठोसर, विष्णू गोरे, कैलास हरदे, श्रीकांत थोरात, हनुमंत श्रीखंडे, संपत गर्जे, बाबासाहेब जावळे, संजय चेमटे, अनिल सोनार, अमोल टोपे, प्रकाश तमनर, विठ्ठल खर्चान, राजाराम कांबळे, संतोष महांडूळे, मनेश सांगळे, अप्पासाहेब गडाख, अमोल गमे, सागर गायकवाड, मिनीनाथ लटके, संजय भैलुमे, मुबारक शेख, गणेश बोडखे, अनुरथ खरात, शेखर जाधव, बाळासाहेब भिंगारदे, राजेंद्र सांगळे, संदिप भिंगारदिवे, नंदराम वाघ, शैलेश सांगळे, गौतम कोकाटे, राजेंद्र आपटे, शाम कांबळे, भागवत गर्जे, अनिल चोळके, संजय सावंत, श्रीनिवास बिरु, योगेश बोबडे आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान या लेखणी बंद आंदोलनास राज्य शासकीय कर्मचारी महासंघ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment