टाकळी ढोकेश्वर मधील कोरोना प्रादुर्भावाचा केस स्टडी म्हणून विचार करणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

टाकळी ढोकेश्वर मधील कोरोना प्रादुर्भावाचा केस स्टडी म्हणून विचार करणार.

 टाकळी ढोकेश्वर मधील कोरोना प्रादुर्भावाचा केस स्टडी म्हणून विचार करणार.

कोरोना नियम न पाळल्यास निर्बंधांचा आरोग्यमत्र्यांचा इशारा.


मुंबई -
शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का याची चाचपणी सुरु असून राज्यातील शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचं कळलंय. अहमदनगरच्या टाकळी ढोकेश्वर मधील नवोदय विद्यालयात जे झालंय त्याचा केस स्टडी म्हणून विचार केला जाईल. पॉझिटिव्ह झाले तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरणासह शाळा सुरु ठेवण्याबाबत भाष्य केल. केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीनं सज्ज आहोत. भारत सरकारनं लहान मुलांना कोवॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं कोवॅक्सिन देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व निर्बंध याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले की, मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट नक्कीच चागंला नाही. 4 टक्के पॉझिटीव्हीटी रेट असेल तर काळजी करण्याची गरज आहे. दिल्लीत सर्व प्रतिबंधित करण्यात आलं आहे. लग्न आणि इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. आपण जर निष्काळजीपणा केला तर आपल्याला धोका होऊ शकतो. कोरोना नियम पाळणार नसू तर निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीनं बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचलीय, त्यापैकी जमेची बाजू 91 जण बरे झाले आहेत असेही ते म्हणाले.
आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंध वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. लग्न आणि इतर कार्यक्रमात निर्बंध पाळले जात नाहीत. पोलीस आणि प्रशासनाचा वापर करावा लागेल. असे सांगून टोपे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही. त्यामुळं आमदार, सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी पुढाकार घेऊन लसीकरण न करण्याची मानसिकता असणार्‍याचं प्रबोध करण्याची गरज आहे. देशाच्या लसीकरणाच्या दरापेक्षा महाराष्ट्राचं लसीकरणाचं प्रमाण थोडं कमी आहे. महाराष्ट्रात 13 कोटी लोकांच लसीकरण झालंय. ही चांगली बाब आहे. मात्र, 8 कोटी लोकांनी पहिला डोस घेतलाय. 9 कोटीचं टार्गेट आहे. मात्र, दुसर्‍या डोसचं लसीकरण 57 टक्के झालंय. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5.5 कोटी आहे. हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करुन त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरनं माहिती दिलेली नाही. बुस्टर डोसचं लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्यानं तोपर्यंत आम्ही वाट पाहू, असं राजेश टोपे म्हणाले.

No comments:

Post a Comment