तीन लाखाचा ऐवज जप्त. जुगार अड्ड्यावर छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 24, 2021

तीन लाखाचा ऐवज जप्त. जुगार अड्ड्यावर छापा.

 तीन लाखाचा ऐवज जप्त. जुगार अड्ड्यावर छापा.


बेलापूर -
बेलापूर खुर्द परिसरातील मळहद सातभाई वस्ती वरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोन लाख एक हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिटके यांचे आदेशानुसार राजेंद्र आरोळे, विलास उकीर्डे, रविंद्र माळी, रविंद्र बोडखे, नितीन शिरसाठ या पथकाने दोन पंचांनासोबत घेवुन सातभाई वस्ती मळहद शिवारात छापा टाकला असता चिंचेच्या झाडाखाली आडोशाला काही ईसम तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलीसांनी जुगाराचे साहीत्य, मोबाईल, मोटार सायकली सह सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे वीस रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या वेळी चंद्रकांत राजाराम खरोटे. प्रविण कचरु मांजरे. दिपक विनायक गायकवाड .संजय दिनकर जगताप. सुनिल दिगंबर शिंदे, रज्जाक सरदार शेख, गौरव आण्णासाहेब घुले, संजय कचरु राऊत, लक्ष्मण मोरे ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले असुन त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्याबाबत श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यामुळे काही काळ अवैध धंदे बंद होते परंतु आता पुन्हा नव्या जोमाने गुटखा मटका जुगार बिंगो लाँटरी हे अवैध सुरु झाले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी या अवैध धंद्यांना आवर घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment