नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 19, 2021

नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सामाजिक उपक्रमातून युवकांना प्रेरणा मिळते- महापौर रोहिणी शेंडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही शिवसैनिक प्रेरित आहोत. त्यांच्या शिकवणी प्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण अंगिकारत  आम्ही काम करत आहोत. समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काही तरी देणे लागते या सामाजिक भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. आजच्या युवकांना या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे प्रेरणा मिळत असते. नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील स्नेहांकुर संस्थेस जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आले. याचबरोबर निंबळक येथील गो शाळेत जनावरांना चारा वाटप करण्यात आला. याच बरोबर हिवाळ्यामध्ये गरजू नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केले.
नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील स्नेहांकुर संस्थेस जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली, निंबळक येथील गोशाळेत चारा वाटप करण्यात आला, दिल्ली गेट येथे गरजू नागरिकांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौर रोहिणी ताई शेंडगे,  माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेणाआप्पा, बाळासाहेब बोराटे, संदीप दातरंगे आदी उपस्थित होते.
शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ - अंकुश साबळे, रामा गुंडू, सुशांत शिंदे, सागर कोडम, अक्षय असलकर, मुन्ना रावळे, श्रीकांत कानडे, कृष्णा शिंदे, विकास तापकिरे, भूषण तिरमल, बाबू शिंदे, ज्ञानेश्वर गुंडू, राहुल असलकर, राहुल भोसले, ओंकार दिकोंडा, दीपक अस्तगावकर, सौरभ क्षीरसागर, रोहित शिंदे, अविनाश साबळे, आदी बनसोडे, यश चितळे, सिद्धांत माळी, सोनू लाहोर, गौरव माने, साई भोईटे, दाद्या भोसले, सार्थक तोडमल, ओंकार शेडाळे, वेदांत कोडम, दिनेश गुंडू, प्रशांत वेटला, श्रीनिवास शिरसुल, सुनील मुत्याल, राकेश सग्गम, प्रवीण मुत्याल, राजू मुत्याल, गोरख कोडम, सागर नल्ला.
विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान - सागर गुंजाळ, प्रवीण लोखंडे, अतुल भोसले, सागर गावडे, सुरज लोखंडे, महेश लोखंडे, राहुल लोखंडे, मोनू उरणे, प्रशांत गावडे, भाऊ गोरे, ओंकार चोरगे, ज्ञानेश्वर चव्हाण, गणेश चव्हाण, रवी उकिरडे, संदीप धारकर, गणेश इप्पलपेल्ली, राहुल शिंदे, भारत श्रीराम, अविनाश दिवटे, फारुख सय्यद, रितेश डेंगळे, दत्ता इपलपेल्ली, अमोल देशमुख, अजय कांबळे, शुभम कैरमकोंडा, सोनू चौधरी, पप्पू नाटाळे, महादेव लोखंडे, बाबू लोखंडे, अमोल कोटकर, प्रसाद वाघ, गणेश साठे, अतुल खंदारे, इरफान शेख, ओंकार शिंदे, सुरज पंचमुख, ऋषी जिंदम, ऋषी सरगम, वरद लकशेट्टी, शुभम साळी, मनोज आडसूळ, विकी चोरगे.
एकदंत गणेश मंदिर, शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठान - ऋषीकेश सामल, ओंकार बुरगुल, रितेश मेरगु, विनित इराबत्तीन, आकाश शिरसुल, ओंकार कोलपे, गौरव कन्ना, अमर सादुल, यश सामल, शुभम मंचेवार, आर्यन पेंडम, संतोष चेन्नूर, समर्थ बोडखे, श्रीनिवास इराबत्तीन, गणेश नागुल, दिशेन नागुल, लकी सामल, रोहन सामल, श्रीनिवास बुरगुल, स्वामी यलदंडी, ओकार श्रीपत आदी उपस्थित होते.
नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे म्हणाले की सण,उत्सव, वाढदिवस साजरी करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिवाजी नगर चा राजा मित्र मंडळाने केडगाव येथील स्नेहांकुर संस्थेस गरजू वस्तूंची  भेट दिली याच बरोबर विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान च्या वतीने निंबळक येथील गोशाळेत चारा वाटप करण्यात आला व एकदंत गणेश मंदिर मित्र मंडळाच्या वतीने दिल्ली गेट येथे हिवाळ्या निमित्त गरजूंना उबदार कपड्यांचे  वाटप केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील गरजूंना मदत करणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून आज माझा वाढदिवस विविध  सामाजिक उपक्रमातून साजरा केला आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment