विवाहित महिलेशी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

विवाहित महिलेशी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गुन्हा दाखल.

 विवाहित महिलेशी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः व्यसनाधिन पती असणार्‍या जळगाव मधील एका विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध प्रस्थापित करणार्‍या केडगाव येथील खुशाल ठारूमल ठक्कर यांचेवर बलात्कार फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठक्कर हे या विवाहित महिलेचे नातेवाईक आहेत.
विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी मूळ राहणार प्रियंका अपार्टमेंट, सिंधी कॉलनी ता. जि. जळगाव हल्ली रा. अरणगाव रोड, सुभद्रानगर अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहून लेखी फिर्याद लिहून देते की ,मी वरील ठिकाणी माझा मुलगा, मुलगी असे एकत्रित कुटुंबात राहत असून खुशाल ठारूमल ठक्कर रा. केडगाव अहमदनगर यांचे घरामध्ये राहते. तो माझा नातेवाईक असूनही जळगाव येथे माझे पती व मुलाबाळांसह राहत होते. त्यावेळी तो माझे घरी येत जात असे. माझे पती व्यसनाधीन असल्याने माझ्या मुलांची पालनपोषणाची जबाबदारी माझ्यावर होती.  नातेवाईक खुशाल ठारूमल ठक्कर याने मला मदत करून माझे मुलास अहमदनगर येथे त्यांच्या दुकानात कामावर ठेवले होते. त्यामुळे त्यांचे नेहमी आमच्या घरी येणे-जाणे होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथून अहमदनगर येथे माझे मुलाबाळांसह दि.24.04.2019 रोजी आणले.
त्यावेळी त्यांनी आम्हाला त्याचे सुभद्रानगर अरणगाव रोड येथील घरात ठेवले. व तो माझ्यासोबत नवरा-बायकोच्या नात्याने राहू लागला. त्यावेळेपासून त्याने माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर मी त्यास वेळोवेळी माझ्याशी लग्न कर असे सांगितले असता त्यांने मला धमकी दिली की, मी तुझ्याशी लग्न करणार नाही व तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही तसेच अहमदनगर शहरात सुद्धा तुला राहू देणार नाही. त्याने दि.22/04/2019 ते दि 04/10/2021 रोजी लग्नाचे आमिष दाखवून माझ्या मनाविरुध्द  माझ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. परंतु माझे  नगर शहरातील इतर कोणीही नातेवाईक नसल्याने मी आजपर्यंत फिर्याद देण्यास आले नाही. त्यानंतर वरील सर्व झालेला प्रकार मी माझ्या आईस फोनद्वारे कळविला. आईने मला धीर देऊन फिर्याद देण्यास सांगितले. मी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. तरी दि. 22/04/2019 ते दि 04/10/2021 पर्यंत अरणगाव रोड सुभद्रानगर अहमदनगर येथील राहते घरी आम्ही नवरा-बायकोसारखे राहत असताना माझ्या नातेवाईक खुशाल ठारूमल ठक्कर रा. केडगाव अहमदनगर यांनी वेळोवेळी मला लग्नाचे आमिष दाखवून माझे  इच्छेविरुद्ध माझ्याशी शारीरिक संबंध ठेवून माझ्याशी लग्न न करता माझी फसवणूक केली आहे. म्हणून माझी खुशाल ठारूमल ठक्कर रा. केडगाव अहमदनगर यांचे विरुद्ध फिर्याद आहे.

No comments:

Post a Comment