खड्ड्यांना एक वर्ष झाल्यानिमित्ताने रामवाडी येथील नागरिकांनी केले अनोखे आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

खड्ड्यांना एक वर्ष झाल्यानिमित्ताने रामवाडी येथील नागरिकांनी केले अनोखे आंदोलन

खड्ड्यांना एक वर्ष झाल्यानिमित्ताने रामवाडी येथील नागरिकांनी केले अनोखे आंदोलन 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  गेल्या वर्षभरापासून रामवाडी परिसरामध्ये असलेले रस्त्याचे काम त्वरित करा अशी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले गेले, येथील नागरिकांनी आज पडलेल्या खड्ड्याला एक वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने अभिनव पद्धतीने खड्ड्याच्या  वाढदिवस साजरा करून अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. यावेळी विकास उदांशिवे रफिक शेख सलीम पठाण जनाबाई विलास घाडगे सलमान शेख सतीश साळवे राजू कांबळे लखन चांदणे सनी चला खेळ तसेच रामवाडी मधील अनेक युवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते
रामवाडी परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी महानगरपालिकेने डीपी रस्ता बनवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली होती मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने व या ठिकाणी महानगरपालिकेने कोणतेही प्रकारचा कचरा उचलला नसल्याने या ठिकाणी मोठी रोगराई पसरलेली आहे. सध्या नगर शहरासह जिल्ह्यामध्ये डेंग्यू मलेरिया यासारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने रामवाडी परिसरामध्ये कोणतेही स्वच्छता मोहीम राबवली नाही, या भागांमध्ये अनेक लहान मुलं आजारी पडत आहे या सर्व गोष्टींना पाहता महानगरपालिकेने लवकरात लवकर या भागांमध्ये औषध फवारणी मोहीम राबवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून पडलेले खड्डे सुद्धा बुजवले नाही महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून देखील सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने आज येथील नागरिकांनी पडलेल्या खड्ड्यांना एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने त्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून अभिनव आंदोलन असे केले आहे.
यावेळी उडानशिवे म्हणाले की, येथील नागरिक  त्रस्त झाले आहेत महानगरपालिकेचे प्रशासन कोणत्याच मागण्यांकडे लक्ष देत नाही म्हणून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करून देखील सुद्धा साधा रस्ता अथवा येथील साफसफाई सुद्धा केली जात नाही. साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत चालले आहे जर वेळीच लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment