अर्थ क्षेत्रात सहकारी पतसंस्था सर्वात वरच्या भागात- राज्यमंत्री विद्याधर अनास्कर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 4, 2021

अर्थ क्षेत्रात सहकारी पतसंस्था सर्वात वरच्या भागात- राज्यमंत्री विद्याधर अनास्कर

 अर्थ क्षेत्रात सहकारी पतसंस्था सर्वात वरच्या भागात- राज्यमंत्री विद्याधर अनास्कर

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सहकार हे जीवन आहे, जगण्याचं शासन व कला आहे. ब्रिटीशांच्या काळापासून सहकाराच्या माध्यमातून काम चालू आहे. या सहकार व अर्थ क्षेत्रात पतसंस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत. मोठ्या बँकांपेक्षाही पतसंस्था सर्वसामान्यांना आधार देत आहेत. राष्ट्रीयकृत व खाजगी बँका कर्ज देताना कर्जदाराची पत पहातात. पण पतसंस्था लहानातल्या लहान सर्वसामान्यांना कर्ज देवून त्यांची पत निर्माण करत आहेत. त्यामुळे अर्थ क्षेत्रात सहकारी पतसंस्था सर्वात वरच्या भागात आहेत. अशा चांगल्या पतसंस्था चळवळीचे नेतृत्वाची धुरा काका कोयटे उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. राज्यातील पतसंस्था चळवळ अधिक सुधृढ व्हावी यासाठी पतसंस्थांना सर्वप्रकारचे सहकार्य करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नूतन अध्यक्ष व राज्यमंत्री विद्याधर अनास्कर यांनी केले.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या सहकार निसर्गोपचार केंद्राचे भूमिपूजन बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानाहून राज्यमंत्री विद्याधर अनास्कर बोलत होते. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, महासचिव शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपकर्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, स्थैरनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, अंजली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदींसह राज्यातून आलेले पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सहकाराच्या मार्गदर्शक ग्रंथ व पुस्तकांची वाजतगाजत ग्रथदिंडी काढण्यात आली. मंत्री विद्याधर अनास्कर, राधेश्याम चांडक यांच्यासह उपस्थित मान्यवर पालखीचे भोई झाले होते. राज्यमंत्री विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व महिला उद्योग विकास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रजनी पाटील यांचा विशेष सत्कार राधेश्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचारींना अर्थ क्षेत्रातिल तज्ञांनी मार्गदर्शन केले.
मंत्री विद्याधर अनास्कर पुढे म्हणाले, भारतातील पहिले सहकाराचे विद्यापीठ राज्यात असावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. सहकारी पतसंस्थांचा उद्देश तळागाळातील नागरिकांना बँकिंग सेवा देण्याचा असल्याने पतसंस्थाना स्वायत्तता असणे आवश्यक आहे. सहकार कायद्यात बदल करण्यासाठी कालभाह्य झालेली कलमे काढून टाकण्यासाठी सहकार भारतीचा अध्यक्ष म्हणून मी प्रयत्न करत आहे.
प्रास्ताविक काका कोयटे म्हणाले, गेल्या दोन दशकांपासून करत असलेल्या प्रयत्नामुळे आता पतसंस्था चळवळीत खूप सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यमंत्री विद्याधर अनास्कर व सहकार भारती पतसंस्थांच्या मागे भक्कमपणे उभी असल्याने करोनाच्या संकट काळात राज्यातील एकही पतसंस्था अडचणीत आली नाही. पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण, 101 चे दाखले, अशा अनेक प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून आम्ही थकलो आहे. आता सहकर भारतीचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी आम्हाला सहकार्य करावे. शिर्डी येथील निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांचे आरोग्य सुध्रुढ रहाण्यासाठी उपचार करण्यात येणार आहेत. कार्याक्रमचे सूत्रसंचलन कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी केले. महासचिव शांतीलाल शिंगी यांनी आभार मानले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी कार्याक्रमचे संयोजन केले.

No comments:

Post a Comment