सक्कर चौकातील जलवाहिनी फुटली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 13, 2021

सक्कर चौकातील जलवाहिनी फुटली.

 सक्कर चौकातील जलवाहिनी फुटली.

पाणीपुरवठा सुरळीत करा- मनोज कोतकर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्टेशन रोडवरील सक्कर चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वसंत टेकडी ते केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी  जलवाहिनी दोन दिवसापूर्वी फुटली आहे. लवकरात लवकर दुरूस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महापालिका प्रशासनाला नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे.
या जलवाहिनी मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात  सिमेंट  गेले आहे जलवाहिनी तुंबली असल्यामुळे  ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी, अमित नगर, श्रीराम कॉलनी, धनश्री कॉलनी, चिपाडे मळा परिसरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  नगरसेवक मनोज कोतकर यांनी फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी केली. यावेळी इंजि. गणेश गाडळलकर, शिवराज आनंदकर, बाळू रणे, इंजि. गीते, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment