महात्मा फुले आरोग्य योजना खर्चाच्या मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 13, 2021

महात्मा फुले आरोग्य योजना खर्चाच्या मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवा.

 महात्मा फुले आरोग्य योजना खर्चाच्या मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शिवसेना नेते संभाजी कदमांची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शासनाने कोरोना काळात वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. सर्वांना मोफत उपचाराची सुविधा करून दिली आहे. मात्र आता त्यानंतरच्या काळात महागडे वैद्यकीय उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत. दीड लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा संपूर्ण कुटुंबासाठी असल्याने यात वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अनेक नागरिकांनी याबाबत भावनाही व्यक्त केलेल्या आहेत. केंद्रशासनाच्या आयुष्यमान भारत योजनेत 5 लाखांचे उपचार मोफत होत आहेत. मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ठराविक लाभार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे इतर सामान्य नागरिक विशेषतः मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सर्वात मोठा आधार असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या खर्चाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी शिवसेना नेते संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संभाजी कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारमार्फत सामान्य नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेत सामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळत आहे. कोरोना काळात आपण मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे लाखो कोरोना बाधित रुग्णांना या योजनेतून मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळाला. सद्यस्थितीत या जनआरोग्य योजने मधून प्रत्येक कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख 50 हजार रुपये खर्चाची मर्यादा आहे. सदरची योजना ही शासकीय तसेच खाजगी रुग्णालयतही राबवली जाते. त्यामुळे अनेक नागरिकांनी खासगी रुग्णालयातही या योजनेतून वैद्यकीय उपचार घेतलेले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची वर्षभरातील दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा संपलेली आहे.
कोरोना काळातील उपचारानंतर अनेकांना म्युकर मायक्रोसिस या फंगल इन्फेक्शनचा हि त्रास सुरू झाला आहे. त्याचेही उपचार योजनेतून मोफत होत आहे. त्यामुळे कोरोना काळातील उपचारानंतर अनेकांना म्युकर मायक्रोसिस फंगल इन्फेक्शनचा त्रास सुरू झाला आहे. त्याचेही उपचार या योजनेतून मोफत होत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांची संपूर्ण कुटुंबासाठी असलेली दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा संपुष्टात आलेली आहे.
कोरोना उपचारासह या योजनेतून इतर अनेक आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीपासून अनेक नागरिक या योजनेच्या माध्यमातून इतर आजारांवरील उपचार घेत आहेत. ज्यांना कोरोना संसर्ग झाला व त्यांनी या योजनेतून उपचार घेतलेल्या आहेत अशा कुटुंबांची दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा संपुष्टात आल्यामुळे त्यांची आता वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक परवड झाली आहे. आधीच कोरोना व लॉकडाउून मुळे सर्व क्षेत्रात आर्थिक नुकसान झालेल्या एक सामान्य नागरिक या आर्थिक संकटांना तोंड देताना हात बंद झालेले आहेत. अशा एखाद्या इतर आजारांसाठी वैद्यकीय उपचार करण्याची वेळ आली, तर खर्च करायचा कुठून असा सवाल त्यांच्या समोर उपस्थित होत आहे. कोरोनामुळे सामान्य व मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या आर्थिक संकटात आहेत. त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here