कोरोना रुग्ण संख्येत आज वाढ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 19, 2021

कोरोना रुग्ण संख्येत आज वाढ.

 कोरोना रुग्ण संख्येत आज वाढ.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  गेल्या दोन-तीन दिवसापासून कमी होत असलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज वाढ झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 257 कोरोना बाधित आढळल्याने काळजी घेण्याची गरज आहे. दोन-तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडा कमी होत असतांना आज मंगळवारी एकुण आकडेवारीत 94 ने वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे. सोमवारच्या तुलनेत आज संगमनेर, श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कर्जत, नगर ग्रामीण, कोपरगाव, अकोले, जामखेड, श्रीरामपूर येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. यामुळे काही अंशी चिंता व्यक्त केली जात आहे. आज  आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 92, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 95 तर अँटीजेन चाचणीत 71 असे 257 कोरोना बाधित आढळून आले. आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 48, श्रीगोंदा 31, राहाता 28, पारनेर 27, कर्जत 21, नगर ग्रामीण 21, कोपरगाव 17, अकोले 12, नगर शहर 10, जामखेड 7, नेवासा 7, शेवगाव 6, श्रीरामपूर 5, इतर जिल्हा 4, पाथर्डी 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

No comments:

Post a Comment