वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 19, 2021

वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या.

 वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारी वृत्ती बळावतात दिसत आहे. अनेक खून प्रकरणे या काळात झाली आहेत. आता आणखी एका घटनेने अहमदनगर हादरले आहे. वडिलांनीच आपल्या 9 वर्षाच्या मुलाला हातपाय बांधून काठीने मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येनंतर तो झाडावरुन पडून मृत झाल्याचा बनाव त्यांनी केला. याबाबत दाखल फिर्यादीवरुन वडिलांवर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत  पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की,  13 ऑक्टोबर 2021 रोजी सागर शंकर पवार (वय 9 वर्षे) या बालकाच्या अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्यूचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने माझ्याकडे तपास देण्यात आला. या अकस्मात मृत्यूच्या चौकशी दरम्यान मृत्यू घडल्याचे घटनास्थळ पंचनामा करुन साक्षीदार राजू फकिरा गाडे (वय 52) रा. टोका-प्रवरासंगम याच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की,  मी नेवासा नगरपंचायत येथे नोकरीस आहे. प्रवरासंगमच्या पंपहाऊस येथे ड्युटीवर असताना तेथे जुन्या डाकबंगल्या शेजारी राहणार्‍या महिला पाण्यासाठी आल्या होत्या. तेथे चर्चा चालू होती की, शंकर पवार याने त्याच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला नेवासा येथे रुग्णालयात नेले. परंतु तो मयत झाल्याने परत घेऊन येवून परस्पर दफनविधी केला. सदर माहितीनंतर  मुलाला दवाखान्यात घेऊन गेलेल्या गाडीचा चालक अनिल वसंत भागवत (वय 23) रा. प्रवरासंगम याच्याकडे चौकशी केली.
साक्षीदार राजू फकिरा गाडे (वय 52) रा. टोका व अनिल वसंत भागवत (वय 23) धंदा-ड्रायव्हर रा. प्रवरासंगम या दोघांचे जबाब व टोका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरुन मयत सागर शंकर पवार (वय 9 वर्षे)यास वडील शंकर रामनाथ पवार रा. प्रवरासंगम ता. नेवासा याने 13 ऑक्टोबर रोजी सायं 6 ते साडे सहाच्या दरम्यान दोरीने हातपाय बांधून अज्ञात कारणासाठी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले. तसेच मयत यास उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय नेवासाफाटा येथे नेवून त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले असता पोलीस ठाण्याला कळवणे कायद्याने बंधनकारक असताना तसे न करता मृतदेह परस्पर घेवून जावून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला.

No comments:

Post a Comment