जिल्ह्यात दरोडे घालणारी टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

जिल्ह्यात दरोडे घालणारी टोळी गजाआड.

 जिल्ह्यात दरोडे घालणारी टोळी गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील खंडागळे व चिंतामणी यांच्या घरावर दरोडा टाकून, 5 लाख 89 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 23 सप्टेंबर ला घडली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी, जिल्ह्यात दरोडे टाकणा-या टोळीचा शोध घेण्याचे आदेश, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिले. आरोपींच्या शोधात असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना, जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दरोड्यांमध्ये, सलाबतपुर तालुका नेवासा येथील, सराईत गुन्हेगार सचिन भोसले व त्याच्या साथीदारांच्या टोळीचा हात आहे. याची गुप्त माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्रीरामपूर पोलिसांनी, सापळा रचून दोघांपैकी अशोक मांडवे या आरोपीस ताब्यात घेतले, यातील दुसरा उसाच्या शेतातून पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र आरोपी जवळील पांढर्‍या रंगाच्या कारची झडती घेतली असता,त्यातून 483 ग्रॅम सोन्याचे ऐवज व 100 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केला आहे.  या दागिन्या संदर्भात कसून चौकशी केली असता. हे सोने चांदीचे ऐवज सचिन भोसले ,प्रधुम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, असिफ शेख व त्यांच्या साथीदारांकडून घेतल्याची कबुली दिल्याने, लागलीच तपास कमी गेलेल्या पोलिसांनी, प्रद्युम भोसले, डिच्चन भोसले, बयंग काळे, असिफ शेख, राहणार सलाबतपुर नेवासा, बाबाखान भोसले, कृष्णा भोसले, राहणार गोंडेगाव नेवासा, रुकुल चव्हाण, राहणार शिरुर जिल्हा पुणे, समीर उर्फ चिंग्या सय्यद, राहणार मुकीदपुर नेवासा, रामसिंग भोसले राहणार गेवराई नेवासा, योगेश युवराज काळे राहणार बिटकेवाडी कर्जत या 7 आरोपीना गजाआड केले असून. आरोपींच्या ताब्यातू 483 ग्रॅम सोने,100 ग्रॅम चांदीची दागिने, स्विफ्ट कार, 7 मोबाईल, 2 मोटार सायकल असा, 27 लाख 92 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून. उर्वरित फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक ,व श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, संयुक्त रित्या केलेल्या कारवाईमुळे, दरोडे, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे अशी 12 गुन्हे उघडकीस आली असून. ज्यामध्ये श्रीरामपूर शहर व तालुक्यात 5, शिर्डीत 1,सोनईत 4,भिंगार कॅम्प मध्ये 1, व शेवगाव येथे 1 यांचा समावेश असून. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर, नेवासा पोलीस ठाण्यात 11,संगमनेर पोलीस ठाण्यात 2, वाळुंज पोलीस ठाणे औरंगाबाद 1, सिलेगाव पोलीस ठाणे औरंगाबाद 1, शेवगाव पोलीस ठाणे 1, एमआयडीसी पोलीस ठाणे औरंगाबाद येथे 2,गंगापूर पोलीस ठाणे औरंगाबाद 1, खेड पोलीस ठाणे पुणे 1, आश्वी पोलीस ठाणे 1, असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करित पोलीस निरीक्षक कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व आमलदारांचे स्वतंत्र पथक नेमुन, त्यांना दरोडेखोरांच्या शोधाचे काम केले. रात्रीचा दिवस करीत ही कारवाई पोलीसअधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी,संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस सहायक निरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, आण्णा पवार, बबन मखरे, विश्वास बेरड, विजय वेठेकर, भाऊसाहेब काळे, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश माळी, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल बसागर ससाणे, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर, रोहीत येतूल, मयूर गायकवाड, राहूल सोळंके, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बर्डे, प्रकाश वाघ, आकाश काळे, विजय धनेधर, कमलेश पाथरुट, योगेश सातपूते, रोहीत मिसाळ, रविन्द्र डुंगासे, सागर सुलाने, संभाजी कोतकर, बबन बेरड, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, अर्जून बढे, भरत बुधवंत, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप,पोलीस सहायक निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, किशोर जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सहायक फौजदारी राजेन्द्र आरोळे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश औटी आदींनी संयुक्तरित्या केली आहे.

No comments:

Post a Comment