नगरकरांच्या हिताची लढाई सत्य व अहिंसेच्या जोरावर नक्की जिंकू- किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

नगरकरांच्या हिताची लढाई सत्य व अहिंसेच्या जोरावर नक्की जिंकू- किरण काळे.

 नगरकरांच्या हिताची लढाई सत्य व अहिंसेच्या जोरावर नक्की जिंकू- किरण काळे.

काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधींना अभिवादन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कार्यकर्ते ज्या संयमाने आज नगरकरांसाठी लढत आहात ही काँग्रेसची आणि महात्मा गांधींची आपल्याला शिकवण आहे. दडपशाही, द्वेष, मत्सर, मनगटशाही याच्या जोरावर ज्यांनी-ज्यांनी जनतेवर राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यांचा शेवट हा नेहमी वाईट झाला आहे. प्रेम, आपुलकी, सद्भावना ही चिरंतन टिकणारी आहे. आपल्यावर अनेक वार, हल्ले होत राहतील. आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. मात्र आपण नगरकरांच्या हितासाठी सुरू केलेली लढाई ही सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने एक दिवस आपण आणि सर्व नगरकर नक्कीच जिंकू असा विश्वास काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज महात्मा गांधी जयंती निमित्त कार्यकर्त्यांमुळे व्यक्त केला.
गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालयामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाला बहादूर शास्त्री यांना देखील जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी, लाला बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नगरकरांसाठी दहशतमुक्त, सुसंस्कृत, शांत, विकसित शहर निर्माण करण्यासाठी मी आणि शहर काँग्रेस गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गावर अविरतपणे चालत राहणार, असेही ते म्हणाले.
आज मी आणि नगर शहरातील काँग्रेस ही असत्यातून जन्म घेतलेले खोटे-नाटे गुन्हे दाखल होणे, खोट्या नोटिसा, खोटे खटले अशा अग्निदिव्यातून जात आहे. शहरातील अपप्रवृत्तींना आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालतो हा गुन्हा वाटत आहे. परंतु त्यांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गाची ताकद माहित नाही. गांधीजींच्या या मार्गा मुळेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. हा मार्ग नगर शहरात दहशतमुक्त व विकसित शहर निश्चितच करू शकतो असा माझा आणि काँग्रेसचा दृढ विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अजुभाई शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, राहुल गांधी विचारमंच शहराध्यक्ष सागर इरमल, अजयभाऊ मिसाळ, महिला काँग्रेसच्या उषाताई भगत, माजी नगरसेविका जरिना पठाण, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शकीला शेख, राणीताई पंडित, शहर जिल्हा सरचिटणीस इम्रान बागवान, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजीत जगताप, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, अभिजित तरोटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment