चेहरा भोळा, 50 अल्पवयीन मुलींवर ऑनलाईन ‘डोळा’, पोलिसांनी धरला भामट्याचा गळा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 8, 2021

चेहरा भोळा, 50 अल्पवयीन मुलींवर ऑनलाईन ‘डोळा’, पोलिसांनी धरला भामट्याचा गळा.

 चेहरा भोळा, 50 अल्पवयीन मुलींवर ऑनलाईन ‘डोळा’, पोलिसांनी धरला भामट्याचा गळा.


नवी दिल्ली :
अल्पवयीन शाळकरी मुलींना गेल्या 3 वर्षांपासून बनावट फोटो पाठवून ब्लॅकमेल करणार्‍या एका सराईत सायबर स्टॉकरला उत्तर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पकडलेले सायबर स्टॉकर महावीर आयआयटी महाविद्यालयातून बीटेक करत आहे, परंतु गेल्या तीन वर्षांपासून तो अनेक अल्पवयीन शाळकरी मुली आणि काही शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करत होता आणि त्याच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याचं दिसून आला आहे.
आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी डिजिटल फूटप्रिंटचाही अवलंब केला आणि नंतर आरोपी महावीरला पाटण्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे तक्रार आली होती, त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना 50 हून अधिक अल्पवयीन मुली आणि शाळेच्या शिक्षिकांना स्टॉक (ऑनलाईन पाळत) केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हायटेक अ‍ॅप वापरत असत. या हायटेकच्या माध्यमातून आरोपीचा बनावट कॉलर आयडी समोरून दिसत होता. एवढेच नाही तर अल्पवयीन विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यासाठी तो व्हर्च्युअल नंबर वापरत असे. तो इतका हुशार होता की, पीडितेला कॉल करण्यासाठी तो पीडितेच्याच फोनवरून अ‍ॅपद्वारे फोन करायचा आणि व्हर्च्युअल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तसेच मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवायचा, मग ब्लॅकमेल करायचा. उत्तर दिल्लीचे डीसीपी सागरसिंह कलसी यांनी सांगितले की, आरोपींनी अल्पवयीन मुलींचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते, जेणेकरून तो त्यांच्या ओळखीच्या इतर मुलींच्या संपर्कात येऊ शकेल आणि तो त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ऑनलाईन क्लासेससाठी सामील व्हायचा. जेव्हा तो कोणाशी बोलायचा, तेव्हा आवाज बदलणार्‍या अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअरची.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here