दोन वाळू तस्कर ‘एसीबी’च्या जाळ्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 18, 2021

दोन वाळू तस्कर ‘एसीबी’च्या जाळ्यात.

 दोन वाळू तस्कर ‘एसीबी’च्या जाळ्यात.

लाच घेणारे नाही...तर लाच देणारे


भंडारा-
लाच घेणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नेहमीच ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले आपण पाहतो. पण भंडार्‍यातील लखादुंप पोलीस ठाण्यातील ‘शिपाई’ पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍याने वाळू तस्करांनी त्यांचा पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 3000 रु ची लाच देण्याचे आमिष दाखविल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केल्यानंतर सापळा लावून 3 हजार रुपयांची लाच देणार्‍या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. निवास ठाकरे (वय 42 वर्षे), नंदकिशोर ठाकरे (वय 28) अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी  शेतकरी आहेत. तसेच ते ट्रॅक्टरदेखील चालवतात. ते वाळू तस्कर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी पोलीस कर्मचार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एसीबीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी वाळू तस्कर आरोपींवर कारवाई करत त्यांचे ट्रॅक्टर जप्त केलं आहे. हेच ट्रॅक्टर परत सोडविण्यासाठी आरोपी संबंधित पोलीस शिपायावर जबरदस्ती 3000 रुपयांची लाच देवून ट्रॅक्टर परत देण्याचा दबाव निर्माण केला. पण पोलिसाने वेळीच एसीबीकडे तक्रार केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here