सुवासिनींना गौराईंच्या विसर्जनाचे दिवशी झाडांचे एकएक रोप भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

सुवासिनींना गौराईंच्या विसर्जनाचे दिवशी झाडांचे एकएक रोप भेट.

 सुवासिनींना गौराईंच्या विसर्जनाचे दिवशी झाडांचे एकएक रोप भेट.

इच्छा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम..


नगरी दवंडी/वार्ताहर
नेवासा ः नेवासा शहरासह तालुक्यात जेष्ठा गौरी महालक्ष्मीचे सोनपावलांनी घरोघरी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सुवासिनींनी विधिवत पूजेने  महालक्ष्मीच्या मुखवट्यांची स्थापना केली.
महालक्ष्मीच्या आगमन प्रसंगी सकाळीच सुवासिनींची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. महालक्ष्मीच्या स्थापनेच्या जागेवर रंगरंगोटी करून विविध रंगीत पडदे लाऊन सजावट करण्यात आली होती.
महालक्ष्मीला सुंदर साज शृंगार केल्यानंतर महालक्ष्मीच्या समोर पंचपक्वान्न ताटे भोग लावण्यासाठी ठेवण्यात आले होते. जेष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी रांगोळी ठशाचे सोन पाऊले काढण्यात येऊन साध्या पद्धतीने नैवैद्य अर्पण करण्यात आला.
दुसर्‍या दिवशी महालक्ष्मीना मिष्टान्न भोजन देण्यात आले.यानिमित्ताने सुवासिनींनी हळदी कुंकू,पान सुपारी साठी घरी जाऊन निमंत्रण दिल्याने पानसुपारी हळदी कुंकू घेण्यासाठी सुवासींनीनी हजेरी लावली होती.
नेवासा शहरासह तालुक्यात देखील महालक्ष्मीच्या आगमन प्रसंगी उत्साहाचे वातावरण दिसून येत होते कोरोनाची महामारी व संकट जाऊ दे पूर्वीचे वैभव प्राप्त होऊ द्या असे साकडे सुवासींनीनी महालक्ष्मीला घातले.तसेच यावेळी इच्छा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मनीषा देवळालीकर यांनी घेतलेले हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सर्व सुवासिनींना एकएक झाडांचे रोप  भेट म्हणून दिले.

No comments:

Post a Comment