पारनेर पोलिस ठाण्याच्यावतीने उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 15, 2021

पारनेर पोलिस ठाण्याच्यावतीने उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन.

 पारनेर पोलिस ठाण्याच्यावतीने उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन.

पारनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीचा निपटारा करण्यासाठी अभिनव उपक्रम..
पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांची माहिती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर : पारनेर पोलिस ठाण्यासह पारनेर तालुक्यातील विविध तक्रारी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रलंबित असून या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली आहे. पारनेर पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम घनश्याम यांनी राबविला असून प्रलंबित तक्रारी व गुन्ह्यांचा निपटारा या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हेलपाटे यानिमित्ताने कमी होणार आहेत.
दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी पारनेर पोलीस स्टेशन अहमदनगर येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी ज्या तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारी बाबत पारनेर पोलीस स्टेशनला अगर वरिष्ठ कार्यालयात  तक्रार अर्ज दिले असतील अशा सर्व अर्जदार यांनी पारनेर पोलीस स्टेशन अगर वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या अर्जाची स्थळप्रत घेवुन दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आपले तक्रारी संदर्भाने समक्ष पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हा अभिनव उपक्रम या पुढील काळात आम्ही राबवणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला निश्चित होईल असा आशावाद पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी व्यक्त केला आहे. तरी या मोहिमेच्या माध्यमातून प्रलंबित गुन्ह्यांची संख्या पण कमी होईल असेही घनश्याम बळप यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment