गावठी कट्टा बाळगणारा आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी गजाआड.

 गावठी कट्टा बाळगणारा आरोपी गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव परिसरात गावठी कट्टा घेऊन मोटरसायकलवर फिरणार्‍या भूषण निकम रा.काकासाहेब म्हस्के रोड. एमआयडीसी यास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे बजाज डीएक्स मोटर सायकल 45,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम हा त्याच्याजवळच्या मोटरसायकलवरून  गावठी कट्यासह केडगाव भागात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे ,पोना बंडू भागवत,पोना शाहिद शेख, पोना नितीन गाडगे,  पोकॉ सुमित गवळी,पोकॉ अभय कदम,पोकॉ प्रमोद लहारे,पोकॉ सुशील वाघेला, यांना बोलावून घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा रचला असता कारमेल शाळेजवळ भूषण निकम फिरताना आढळून आला असता.
त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे तसेच त्याच्याकडील बजाज एक्स डी मोटर सायकल सह45200 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर717/2024 आर्म अ‍ॅक्ट3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील आरोपी विरूद्ध या पुर्वीही राहुरी पोलीस स्टेशन व भिंगार पोलीस स्टेशन येथे269/2012भादवि कलम 395,341,182,120(ब)प्रमाणे,77/2014भादवी कलम394,34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here