अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार.

 अल्पवयीन मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार.

गुन्हा दाखल. नराधम पिता गजाआड.

संगमनेर - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पोटच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधम पित्यास पोलिसांनी अटक केली आहे. आई-वडिलांसोबत राहणार्‍या संबंधित 11 वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या काळातच, 22 जुलैच्या रात्री, 28 जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (दि. 29) रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याला आज न्यायायलात हजर करण्यात येणार आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment