पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार चालू करा - अविनाश पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 9, 2021

पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार चालू करा - अविनाश पवार

 पारनेर तालुक्यातील आठवडे बाजार चालू करा....

अविनाश पवार मनसे उप तालुकाध्यक्ष पारनेर

नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील शेतकरी पुर्ण पणे आर्थिक मेटाकुटीला आला आहे पारनेर तालुक्यात राजकीय कार्यक्रम गर्दी करुन जोरदार चालु आहे तीथे कसलीही बंधनं नाहीत नियम नाहीत आणि तालुक्यातील जगाचा पोशिंदा शेतकरी राजा कोरोनाच्च्या नावाने वेठीस धरला आहे हे योग्य नाही आज नैसर्गिक आपत्ती व बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला मातीमोल भावाने विक्री करावी लागते आहे कोरोना फक्त शेतकरी बांधवांन साठी आहे काय..,?आठ दिवसांत जर तालुक्यातील बाजार चालू झाले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तहसील दार व जिल्हा अधीकारी यांना निवेदन देऊन आंदोलन सुरू करणार शेतकरी बांधवांन साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागते तरी मागं हटनार नाही.


No comments:

Post a Comment