कोपरगावातील बंधूंचा जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा चक्रव्युह! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 10, 2021

कोपरगावातील बंधूंचा जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा चक्रव्युह!

 कोपरगावातील बंधूंचा जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा चक्रव्युह!

नगर जिल्ह्यासह औरंगाबाद व बीडमध्ये ऑनलाईन लॉटरी (जुगार) तेजीत...


॥ राम नळकांडे ॥
अहमदनगर ः
झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे लॉटरी.. लॉटरी लागली कि आपली स्वप्न पूर्ण होण्याचा हमखास उपाय.. पण अशा या लॉटरीचे विनापरवाना ऑनलाइनचे दुकान थाटून कोपरगावातील बंधूंनी जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीचा चक्रव्यूह निर्माण केला आहे जिल्ह्यात अनेक तरुण या चक्रव्यूहात गुंतले असून लॉटरीच्या नादापायी लाखो रुपये गमावून बसले आहेत. पोलीस प्रशासन अशा विनापरवाना लॉटरी व्यावसायिकांवर कार्यवाही करत असले तरी हा व्यवसाय एक दिवस कारवाईमुळे बंद पडतो तर दुसर्‍या दिवशी मोठ्या जोमाने सुरू होत आहे. कोपरगाव मधील दोन बंधूंचा ऑनलाइन लॉटरीचा चक्रव्युह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उध्वस्त करून या लॉटरी मुळे उध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला या चक्रव्यूहातून बाहेर काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक शहरात व खेडड्यापाड्यात या दोन भावांनी ऑनलाईन लॉटरीचा जुगार पोहोचवला आहे. त्यांना साथ औरंगाबादकरांची व बीडकरांची लाभली आहे. त्यांच्या मदतीने कोपरगाव, शिर्डी, राहता, संगमनेर, नगर शहर, नेवासा, शेवगाव या प्रत्येक ठिकाणी दुकानदारी सुरू आहे. यातून जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. पोलीस प्रशासनाने मागील दोन दिवसात नगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करूनही या मुजोर भावंडांचा एजंट मार्फत व पोलीस दलातील मोजक्या लोकांना सोबत घेऊन धंदा धडाक्यात सुरू आहे. मागील दोन दिवसात अनेक ठिकाणी कारवाया करूनही सर्व दुकाने सुरू आहेत. दोन्ही भाऊ कोपरगाव मध्ये बसून पूर्ण जिल्हा नियंत्रणात ठेवत आहेत. शिर्डी सारख्या पवित्र नगरीत मोठ्या प्रमाणात यांची उलाढाल सुरू आह. स्वतःच्या नावाने लॉटरी बनवून बाजार मध्ये फिरून भाऊ भाऊ जोडीने मार्केटिंग करतात व त्यांना पोकळ हवेतील लोक साथ देतात. त्यामुळे हे दोघे भाऊ लोखंडासारखे घट्ट पाय रोवून जिल्हाभरात धंदा वाढवतच आहेत. शहर व ग्रामीण भागातील गरीब लोकांना झटपट पैसे कमावण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या जाळ्यात ओढून लुबाडतात. बसल्या जागेवरुन घरातून दर पंधरा मिनीटाला  निकाल काढतात. प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्व मॅनेजमेंट केले आहे. तुम्ही बिनधास्त धंदा करा असे सांगून दुकानदारांना कमिशनवर दुकान चालवण्यास भाग पडतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here