सभापती-पुष्पाताई बोरुडे, उपसभापती-मीनाताई चोपडा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, September 13, 2021

सभापती-पुष्पाताई बोरुडे, उपसभापती-मीनाताई चोपडा.

 सभापती-पुष्पाताई बोरुडे, उपसभापती-मीनाताई चोपडा.

महिला बालकल्याण सभापती पदासाठी शिवसेना,
उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेतील महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी हालचाली सुरू झाल्या असून शिवसेनेकडून नगरसेविका पुष्पाताई बोरूडे यांनी 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपसभापती पदासाठी नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मनपाच्या महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक दि.15 सप्टेंबर रोजी पीठासीन अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून आज शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पाताई बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेंनप्पा, सुरेखा कदम व अनुमोदन कमल सप्रे,शांताबाई शिंदे आहेत.
राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीनाताई चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर सूचक म्हणून नगरसेविका दीपाली बारस्कर व अनुमोदक म्हणून  शोभा बोरकर हे आहेत.
यावेळी नगरसेविका शीतल जगताप, महापौर रोहिनीताई शेंडगे,नगरसेविका दीपाली बारस्कार, शोभाताई बोरकर,स्थायी समितीच्या सभापती अविनाश घुले,मनपा विरोधी पक्षनेता संपत राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे,मा.महापौर भगवान फुलसौंदर, मा. महापौर सुरेख कदम,मा.महापौर शीलाताई शिंदे, संभाजी कदम,नगरसेवक,मा.उपमहापौर अनिल बोरुडे,  शाम नळकांडे, प्रकाश भागानगरे, कुमारसिंह वाकळे,  गणेश कवडे, पवार, सचिम शिंदे संजय चोपडा,दगडू मामा पवार, रामदास आंधळे,बाळासाहेब बारस्कर, दत्ता पाटील सप्रे,अशोक बडे, अमोल येवले,संजय शेंडगे, विजय पठारे,आशाताई निंबाळकर, स्मिता अष्टेकर,अरुणा गोयल, सुषमाताई पाडोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here