क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी!

 क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची 230 वी जयंती  टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामपंचायत कार्यालयात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थिताश मान्यवरांनी उमाजी नाईक यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल उजाळा देण्यात आला.उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतीकारक होते.इंग्रजांना सलग 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे व  क्रांतीचे स्वप्न पाहणारे निधडे वीर म्हणजे राजे उमाजी नाईक होय.पण इतिहासाने उमाजी नाईक यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही.वयाच्या 43 व्या वर्षी देशासाठी फाशीवर जाणारे ते महान देशभक्त होते. अशा राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यात आले.
यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी पा.,अर्बन बँकेचे संचालक अशोककाका कटारीया,लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, उपसरपंच सुनिल चव्हाण,मा.सरपंच शिवाजीराव खिलारी,ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ तराळ, दिपक साळवे सामाजिक कार्यकर्ते संजय झावरे,देवीदास आल्हाट,राजेंद्र जाधव,अन्सार शेख,जय मल्हार क्रांती संघटना  युवक कार्याध्यक्ष सुनिल माकरे,बाळासाहेब जेजुरकर, बबन जेजुरकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment