कोरोना मुक्त होऊन नगर शहरात सुख, शांती नांदावी श्रींच्या चरणी आ. संग्राम जगताप यांची प्रार्थना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

कोरोना मुक्त होऊन नगर शहरात सुख, शांती नांदावी श्रींच्या चरणी आ. संग्राम जगताप यांची प्रार्थना

 कोरोना मुक्त होऊन नगर शहरात सुख, शांती नांदावी श्रींच्या चरणी आ. संग्राम जगताप यांची प्रार्थना

कापड बाजारातील आदर्श व्यापारी मंडळाच्या ‘श्री’ गणेशाची प्राणप्रतिष्ठा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते कापड बाजारातील आदर्श व्यापारी मंडळाच्या ’श्री’ गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.गेल्या दोन वर्षांपासून आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाला असून या कोविडच्या संकटाला सामोरे जात आहे.हे संकट दूर होऊन शहर कोरोना मुक्त होऊन  सुख,शांती नांदावी अशी प्रार्थना श्रींच्या चरणी आ.संग्राम जगताप यांनी केली.
कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मंडळाच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मा.नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तातेड, किरण पोखरणा, बापूसाहेब गोरे, लक्ष्मिकांत शेटीया, अनिल दुगड, प्रवीण शिंगवी, विकास सुराणा, रवींद्र बाकलीवाल, अमित पीतळे, मयूर पितळे,डॉ.सचिन बोरा, राजू दयमा, ओंकार घोलप, राजू गांधी तसेच मंडळाचे आधी सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment