कारवाईसाठी गेलेल्या तलाठी-होमगार्डसना शिवीगाळ व दमदाटी.. गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

कारवाईसाठी गेलेल्या तलाठी-होमगार्डसना शिवीगाळ व दमदाटी.. गुन्हा दाखल.

 कारवाईसाठी गेलेल्या तलाठी-होमगार्डसना शिवीगाळ व दमदाटी.. गुन्हा दाखल.

अजनुज-देऊळगाव नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज-देऊळगाव नदीपात्रातील अवैद्य विनापरवाना वाळू चोरी करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठी व होमगार्डसना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती गुप्तमाहितीदाराकडून जिल्हा गौण खनिज पथकातील नायब तहसीलदार खातलेयांना मिळताच त्यांनी अजनुज,ता.श्रीगोंदा व अजनुज ते वडगाव दरेकर,ता.दौंड मध्यरात्री 1 च्या सुमारास तलाठी सचिन प्रभाकर बळी त्यांनी आपल्या सोबत अक्षय काळे नावाचा होमगार्ड घेवून घटनास्थळी रवाना झाले. मात्र वाळू तस्कर महसूलचे अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच त्या अजनुज,ता.श्रीगोंदा व अजनुज ते वडगाव दरेकर,ता.दौंड जाणारे रोडवर वाळू काढत असताना पळ काढण्याचा प्रयत्न केला तरीही तलाठी व होमगार्ड यांनी वाळूचा एक ट्रक पकडला त्यामध्ये 500000/- रु.किंमतीचा एक हायवा नंबर एम.एच.42.ए.क्यु.8883,पिवळा राखाडी रंगाचा तसेच 26000/- रु.किंमतीची सुमारे हायवामध्ये 4 ब्रास वाळु असा एकूण  5,26000/-रु. मुद्देमाल यांनी पकडला.
तलाठी यांनी होमगार्ड काळे यास बसवून ट्रक तहसीलदार कार्यालयात नेण्यास सांगितले असता ड्रायव्हर-अक्षय सुनिल डाळिंबे तसेच हायवा क्र.एम.एच.42.ए.क्यु.8883 हिचे मालक,यांनी फिर्यादी व साक्षीदार होमगार्ड अक्षय कांबळे यांना शिवीगाळी दमदाटी करुन धक्काबुक्की मारहाण करुन हायवा गाडीमधुन खाली उतरण्यास भाग पाडुन होमगार्ड अक्षय काळे यास खाली उतरवले व गाडी घेऊन पसार झाले पर्यायी तलाठी सचिन प्रभाकर बळी यांना मोकळ्या हाताने परत यावे लागले. त्यानंतर तलाठी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम 353,379,143,147,149 सह पर्या.का.क नुसार ड्रायव्हर-अक्षय सुनिल डाळिंबे,व हायवा क्र.एम.एच.42.ए.क्यु.8883 हिचे मालक,यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यान घटनेचा पुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.

No comments:

Post a Comment