कर्डीलेंच्या मध्यस्थीनंतर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी उपोषण मागे घेतले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

कर्डीलेंच्या मध्यस्थीनंतर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी उपोषण मागे घेतले.

 कर्डीलेंच्या मध्यस्थीनंतर तनपुरे साखर कारखाना कामगारांनी उपोषण मागे घेतले.


राहुरी-
राहुरीतील डॉ.तनपुरे साखर कारखान्यातील कामगारांनी पगार व इतर 25 कोटी 36 लाख रुपये देणी प्राप्त करुन घेण्यासाठी 22 ऑगस्टपासून सुरू केलेले उपोषण माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांचे मध्यस्थीनंतर काल मागे घेतले आहे.
माजीमंत्री ना.राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची विळद घाट येथे बैठक होऊन कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेतला. काल रविवार दि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजीमंत्री शिवजीराव कर्डीले, चेअरमन नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, संचालक महेश पाटील, शामराव निमसे, सुरसींग पवार, रविंद्र म्हसे, बाळकृष्ण म्हसे, ऊत्तम आढाव, अर्जुन बाचकर, के.मा.कोळसे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, ज्ञानेश्वर विखे, सुबोध विखे, मनोज गव्हाणे, पत्रकार विनीत धसाळ यांनी कामगारांशी चर्चा केली. कामगारांनी गेल्या 14 दिवसापासून उपोषण सुरू केले होते.सत्ताधारी संचालक मंडळाने दोन पाऊले पुढे तर कामगारांनी दोन पाउले मागे व यात एक वर्षाचा निधी लॅप्स होईल. तो निधी जिल्हा परिषद इतर कामाकडे वाळवू शकते. तो वळवू नये.  याबाबत पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास  खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते यांच्यासह नगर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य यांच्यासह उपोषण करण्याचा इशारा कर्डीले यांनी दिला. उपोषणातून मार्ग न निघाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच घरपट्टी वसुलीचा निर्णय ही ग्रामपंचायतीना पूर्वी प्रमाणे आहे तसा देण्यात यावा, आत्तापर्यंत एकाही घरकुलास मंजुरी मिळाली नसून गोरगरीब माणसे वंचित राहू नये यासाठी तातडीने घरकुलांना मंजुरी देण्यात यावी. ग्रामपंचायतिची ऑनलाईन कामे करणार्‍या कर्मचार्‍यांचे नियुक्ती अधिकार सरपंचांना देण्यात यावेत असे कर्डीले यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपासभापती संतोष म्हस्के, संचालक दिलीप भालसिंग यासह नगर तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

No comments:

Post a Comment