महिलेची गायब पर्स सोन्यासह सुपूर्त केली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

महिलेची गायब पर्स सोन्यासह सुपूर्त केली.

 महिलेची गायब पर्स सोन्यासह सुपूर्त केली.

तोफखाना पोलिसांची कामगिरी..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोजी महिला  तृप्ति अमोल घाडगे रा. तळोजा पनवेल जि. रायगड या त्यांची बहिणीसोबत ज्युस पिण्यासाठी रॉयल ज्युस सेंटर झोपडी कॅन्टिन येथे आल्या असता त्यांनी त्यांचेकडील 2.5 तोळा वजनाचे दागीने व काही रोख रक्कम हे त्यांचे पर्स मध्ये ठेवलेले होते. ती पर्स येताना रस्त्यात कोठेतरी गहाळ झाली होती. या महिलेची गहाळ झालेली पर्स व त्यातील 2.5 तोळा सोन्याच्या दागीण्यांचा तोफखाना पोलीसांनी काही तासातच शोध घेवुन त्या महिलेस पर्स सुपुर्त केल्याबद्दल तोफखाना पोलिस कर्मचार्‍यांचे कौतुक केले जात आहे.
तृप्ती या पोलीस स्टेशनला आल्या असता तोफखाना पोलीस स्टेशनच्या  महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी  पो.उप निरीक्षक समाधान सोळंके,  शकिल सय्यद,  शैलेश गोमसाळे, अमोल शिरसाठ, अकिब इनामदार यांना तात्काळ पर्सचा शोध घेणेकामी रवाना केले असता नमुद पथकाने काही तासातच सदर पर्सचा व त्यातील दागीने व रोख रक्कम याचा शोध घेवुन ही पर्स सुस्थितीत महिलेच्या ताब्यात दिली आहे. पोलिसांचे या कामगिरी बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. ही कारवाई  मनोज पाटील पोलीस अधिक्षक,  सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, विशाल ढुमे उप विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक.जे.सी. गडकरी यांनी व त्यांचे तपास पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment