शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हा. चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हा. चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड

 शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हा. चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी अविनाश निंभोरे तर व्हा चेअरमन पदी गंगाराम गोडे यांची निवड जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यांना सहकार्य बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांचे लाभले यावेळी उपस्थित संचालक
  या निवडीत  श्री. अविनाश निंभोरे हे 13 मते मिळवून चेअरमन तर व्हा. चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड झाली. अविनाश निंभोरे यांना सूचक म्हणून माजी व्हा. चेअरमन नानासाहेब बडाख तर  राजू मुंगसे  यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या. शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड झाली.
यावेळी बँकेच्या संचालक  सीमाताई क्षिरसागर, उषाताई बनकर ,मंजुषाताई नरवडे, विद्युल्लताताई आढाव ,संतोष अकोलकर ,दिलीप  औताडे ,राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख ,संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार  सलीमखान पठाण, सुयोग पवार,किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here