केडगाव येथे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

केडगाव येथे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

 केडगाव येथे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

सात अंगणवाड्या व मनपा ओंकारनगर शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम.



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केडगाव येथे ओंकारनगर, रेणुकानगर क्रमांक 1 व 2, शाहूनगर, बँक कॉलनी, सुवर्णानगर, एकनाथनगर अंगणवाडी व महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहमदनगर यांच्या वतीने शाहूनगर बसस्टॉप येथे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे होत्या.तर नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका शांताबाई शिंदे, अहमदनगर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या देशमुख,माजी प्रकल्प अधिकारी अपर्णा कुलकर्णी, पर्यवेक्षिका मनिषा काळे, आरोग्य सेविका ज्योती क्षिरसागर, बलभीम कर्डीले,बोरूडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये पोषण अभियान गीत, गरोदर माता ओटीभरण,मुलीच्या जन्माचे स्वागत, अन्न प्राशन उपक्रम इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी राष्ट्रीय पोषण माह अभियानाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी वृषाली गावडे,संध्या देशमुख यांनी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पोषण माह अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती आपल्या मनोगतातून दिली.
अंगणवाडी ताई या लहान मुलांच्या पहिल्या शिक्षिका असतात.आज सात अंगणवाड्या आणि ओंकारनगर शाळा यांनी पोषण माह अभियान राबवून व्यापक जनजागृती केली आहे.अंगणवाड्यांमध्ये नेहमीच लहान मुले,गरोदर माता यांच्या पोषक आहाराची काळजी घेतली जाते.महानगरपालिकेच्या ओंकारनगर शाळेतील मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी ओंकारनगर ही महानगरपालिकेची एक आदर्श शाळा बनवली आहे.मनपाच्या इतर शाळाही ओंकारनगर शाळेप्रमाणे बनवण्यासाठी ओंकारनगर शाळेतील शिक्षकांची मदत घेऊ,असे महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या.
 यावेळी सर्वांनी पोषण अभियानाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया घोडके, मनिषा बारवकर, शैला सुक्रे, जिजा दळवी, यशवंती जाधव, शैला उदमले,सिंधू रासकर, रोहिणी दळवी,शोभा शिंदे,आशा लाळगे,उषा पाडळे, मनिषा माळवदे,कमल हुलगे, सहशिक्षक शिवराज वाघमारे सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. तर ओंकारनगरच्या अंगणवाडी सेविका विजया घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment