अडीच वर्षाच्या बालकाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड”कडून दखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

अडीच वर्षाच्या बालकाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड”कडून दखल

 अडीच वर्षाच्या बालकाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड”कडून दखल

‘स्वानंद’ ला मिळाले गोल्ड मेडल व प्रमाणपत्र..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  चि. स्वानंद अवघ्या 2 वर्ष 5 महिने वयाच्या बालकाने स्वतःचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंदविले आहे. स्वानंद हा बालक संस्कृत मंत्र, बालकविता, सर्व इंग्रजी मुळाक्षरे, इंग्रजी नंबर 1 ते 10 बोलतो. सर्व मानवी शरीराचे अवयव, फळे, ड्रायफ्रुट्स याचे नाव सांगतो. तसेच परिवारातील सर्व नावे सांगतो व विविध अ‍ॅक्शन ओळखतो. अहमदनगर येथील महानगर पालिकेचे शहर अभियंता व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे आणि एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री माधवराव गलांडे यांचा नातू व सौ स्नेहल व श्री अमोल गलांडे यांचा मुलगा असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अ‍ॅप्रिसीएशन या शीर्षकाखाली स्वानंद गलांडे याचे नाव आणि त्याने केलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे व यासाठी त्याला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
स्वानंद गलांडे आता दोन वर्षे 5 महिन्याचा झालेला असून तो 7 संस्कृत मंत्र, 5 बालकविता, सर्व इंग्रजी मुळाक्षरे ए टू झेड व इंग्रजी नंबर 1 ते 10 बोलतो व 15 मानवी शरीराचे अवयव, बारा फळे, तीन ड्रायफूड, सहा अ‍ॅक्शन परिवारातील आठ नावे सांगतो तसेच घरातील विविध वस्तू ओळखतो याबरोबर तो छत्रपती शिवरायांची महती प्रदर्शित करणारे प्रसंग जसे की अफजलखानाचा वध, स्वराज्याची शपथ या नाट्यकृती करून दाखवतो. स्वानंद चे व्हिडिओ, फोटो व जन्मतारखेच्या सत्यता या बाबीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने पडताळणी करून सत्यता पाहिल्यानंतरच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद घेऊन गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळाले आहे. याबद्दल स्वानंद ची आई सौ स्नेहल व वडील श्री अमोल गलांडे यांना आनंद व स्वानंदचा अभिमान वाटत आहे. हे मेडल मिळविण्यासाठी आई सौ स्नेहल व वडील श्री अमोल गलांडे यांनी परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment